नागपूर,
Deaf Students केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे चालविल्या जाणाऱ्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे अर्थात एम्समध्ये रुग्ण सेवा कशी हाताळली जाते, याची माहिती मुक बधिर विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. मोरया फाऊंडेशनच्या वतीने मुलांसाठी ही खास अभ्यास भेट घडवून आणण्यात आली. एम्सने त्या संबंधी लेखी परवानगी दिल्यानंतर ठरलेल्या दिवशी 50 विद्यार्थ्यांना घेऊन बस सकाळी 9.30 ला एम्स रुग्णालयात पोहचली. गेटवर चेकिंग झाल्यावर सर्वांना मास्क लावून ओपीडी विभागात आणण्यात आले. शोभित कापसे यांनी विद्यार्थ्यांना रुग्ण नोंदणी कशी केली जाते, या बाबत विस्तृतपणे माहिती दिली. असे एका प्रसिद्धी पत्रकात रजनी चव्हाण यांनी सांगितले.
सौजन्य : देवराव प्रधान, संपर्क मित्र