आंतरराष्ट्रीय
- वसंत गणेश काणे
Finland in NATO ‘नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन' म्हणजेच ‘नाटो' ही ३० देशांची एक आंतरराष्ट्रीय युती असून ती १९४९ साली १२ देशांनी मिळून स्थापन केली आहे. Finland in NATO पुढे १९५२ या वर्षी २ आणि १९५५ आणि १९८२ मध्ये एकेक देश या युतीत सामील होत गेला. १९९९ यावर्षी ३, २००४ यावर्षी एकदम ७, २००९ यावर्षी २, २०१७ व २०२० मध्ये एकेक देश सामील झाला. Finland in NATO युरोप, अमेरिका आणि आशियातील देश याचे सदस्य आहेत. या युतीच्या करारातील कलम ५ नुसार कुणाही एका देशावर झालेला हल्ला हा सर्वांवर झालेला हल्ला मानला जाईल आणि गरज भासल्यास ते सैन्यदलासह त्या एकाच्या साह्याला धावून जातील. Finland in NATO दुस-या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन देशांच्या दोन गटात जगाची विभागणी झाली. रशियाच्या संभाव्य आक्रमणाच्या भीतीने बरेच देश अमेरिका केंद्रित नाटो संघटनेचे सदस्य बनले. साम्यवादी रशियाच्या अरेरावीस विरोध करणे, साम्यवादाचा प्रसार रोखणे अशी करारात लिखित नसलेली उद्दिष्टेही नाटो सदस्य देशांची आहेत, असे मानले जाते. Finland in NATO
नाटोचा ३१ वा सदस्य फिनलँड Finland in NATO
अलबामा, बेल्जियम, बल्गेरिया, कॅनडा, क्रोएशिया, झेक रिपब्लिक, डेन्मार्क, एस्टोनिया, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आईसलँड, इटली, लॅटव्हिया, लिथुनिया, लक्झेंबर्ग, माँटेनिग्रो, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हॅनिया, स्पेन, टर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि आता २०२३ या वर्षी फिनलंड असे ३१ देश नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनचे (नाटो) सदस्य आहेत. रशियाने फिनलंडच्या नाटो प्रवेशावरून युद्ध भडकेल, अशी धमकी दिली आहे. Finland in NATO युक्रेनच्या युद्धातच रशियाची पुरतेपणी दमछाक झालेली असतानासुद्धा पुतिन यांनी युद्धाची भाषा वापरली आहे. कदाचित हे शब्द संतापाच्या भरात त्यांच्या तोंडून बाहेर पडले असतील. हे काहीही असले तरी फिनलंडचा नाटोत प्रवेश होणे, ही बाब रशियाला अतिशय गंभीर बाब वाटते आहे, हे स्पष्ट आहे. Finland in NATO लॅटव्हिया, इस्टोरिया, लिथुअॅनिया आणि पोलंड हे नाटो सदस्य देश असून यांच्या सीमा रशियाला स्पर्श करतात. या सर्वांची मिळून रशियाला लागून असलेली एकूण सीमा १२१५ किलोमीटर भरते. एकट्या फिनलंडची रशियाला लागून असलेली सीमा १३०० किलोमीटर आहे. त्यामुळे आता रशियाला लागून असलेली नाटो सदस्य राष्ट्रांची एकूण सीमा २५१५ किलोमीटर इतकी होईल, म्हणजे जवळजवळ दुपटीने वाढेल.
रशियाचा जळफळाट का? Finland in NATO
३ लक्ष ३७ हजार चौ. कि. मी. क्षेत्रफळ असलेला फिनलंड (भारत ३३ लक्ष चौ. कि. मी. क्षेत्रफळ) हा स्कँडिनेव्हियातील एक देश आहे. रशिया हा क्षेत्रफळाने जगातला सर्वात मोठा देश असून त्याचे क्षेत्रफळ १ कोटी ७१ लक्ष चौरस किलोमीटर आहे. रशियाच्या तुलनेत चिमुकला असलेल्या फिनलँडच्या पश्चिमेला स्वीडन, उत्तरेला नॉर्वे, पूर्वेला रशिया तर दक्षिणेला फिनलंडचे आखात आहे. हेलसिंकी ही फिनलंडची राजधानी आहे. Finland in NATO फिनिश व स्वीडिश या दोन्ही भाषा बोलल्या जाणा-या फिनलँडची लोकसंख्या ५० लाखांपेक्षा थोडीशीच जास्त आहे. ही विरळ लोकवस्तीही देशाच्या दक्षिण भागात राहते. असे असले तरीही औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेला फिनलंड उत्तम सामाजिक व राजकीय स्थैर्य असलेला देश आहे. Finland in NATO या लहानशा देशाचा दुस-या महायुद्धाच्या अगोदर रशियाने लचका तोडला आहे. त्यावेळी फिनलंडने चांगलीच झुंज देत रशियाला जेरीस आणले होते. या युद्धाची तुलना आजच्या युक्रेन युद्धाशी करता येईल. हा अनुभव गाठीशी असल्यामुळेच फिनलंड नाटोचा सदस्य होतो आहे, ही बाब रशियाला का रुचलेली नाही, हे लक्षात येईल.
टर्कीचा कोलदांडा Finland in NATO
दुस-या महायुद्धानंतर फिनलँड आणि स्वीडन हे देश तटस्थ आहेत. मात्र, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर त्यांना असुरक्षितता भेडसावत आहे. फिनलँड आणि रशिया यांच्यात १३०० किलोमीटर लांबीची सीमा आहे. Finland in NATO ही अन्य कोणत्याही नाटो सदस्य देशाच्या रशियाशी असलेल्या सीमेपेक्षा जास्त लांब आहे. त्यामुळे फिनलँडला रशियन आक्रमणाची सर्वात जास्त भीती होती. म्हणून नाटोचे सदस्यत्व स्वीकारण्यास फिनलँडमधले सर्व पक्ष एका पायावर तयार होते. पण फिनलँड आणि स्वीडनाला नाटोमध्ये प्रवेश देण्यास टर्कीचा विरोध होता. Finland in NATO टर्कीचा आक्षेप असा होता की, टर्कीमधील बेकायदा आणि बंडखोर कुर्दिस्तान पीपल्स पार्टीच्या सैनिकांना फिनलंडने १९८४ मध्ये आश्रय दिला होता. या संशयित दहशतवाद्यांना फिनलंडमधून हाकलून देऊ, असे आश्वासन फिनलँडने दिल्यानंतर टर्कीने आपला नकाराधिकार (व्हेटो) मागे घेतला आणि फिनलंडला नाटोत प्रवेश देण्यास सर्व म्हणजे ३० सदस्य राष्ट्रे तयार झाली. Finland in NATO स्वीडननेही असेच आश्वासन दिले होते; पण स्वीडनच्या न्यायालयाने स्वीडनचा निर्णय रद्दबातल ठरविला आणि त्यामुळे स्वीडनचा नाटोमधला प्रवेश अडकून पडला आहे. नाटोच्या घटनेप्रमाणे प्रत्येक सदस्य देशाला, दुसèया देशाला सदस्य करून घेण्याच्या प्रश्नाबाबत, नकार देण्याचा (व्हेटो) अधिकार असतो.
सुखी, समाधानी आणि समृद्ध
फिनलँड, स्वीडन तर रशिया...
फिनलँड हा लोकशाहीवादी देश आहे. त्याची आर्थिक स्थिती उत्तम आहे. नोकिया नदी फिनलंडमधली. या नदीच्या नावाने बाजारात आलेला नोकिया फोन फिनलँडचा आहे. Finland in NATO फिनलँड, स्वीडन हे देश लोकशाहीवादी आहेत आणि तरीही त्यांनी उत्तम आर्थिक प्रगती केली आहे. एकेक देश एकेका ब्रॅण्डसाठी ओळखला जातो. फिनलँडने नोकिया दिला, तर वोल्वो, बोफोर्स हे स्वीडनचे ब्रँड आहेत. रशिया आणि फिनलँडमधल्या लांबलचक सीमेच्या एका बाजूला असलेला फिनलंड हा सुखी, समाधानी आणि समृद्ध आहे. यातले एकही विशेषण सीमेच्या दुस-या बाजूच्या असलेल्या रशियाला लागू होत नाही. असा हा फिनलँड आता नाटोत सामील झाला आहे. Finland in NATO युक्रेन युद्धामुळे रशियाची पार दमछाक झाली आहे. म्हणून मदतीसाठी आपल्या धाकट्या भावाचे म्हणजे चीनचे ज्येष्ठत्व मान्य करण्याची वेळ रशियावर आली. पण धाकटा भाऊ चांगलाच बेरकी आहे. त्याने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत अण्वस्त्रे दुस-या देशात हलविण्याच्या रशियाच्या धोरणाला विरोध केला आहे. Finland in NATO याच सुमारास फिनलँडमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जगातील सर्वात तरुण महिला पंतप्रधान सना मरीन यांचा पराभव झाला. खरे तर कोविड-१९ ची हाताळणी आणि युक्रेनला पाठींबा यामुळे त्यांची जगभर वाहवा झाली होती. पण त्यांची आर्थिक धोरणे मतदारांना पसंत पडली नाहीत. Finland in NATO वाढलेली महागाई, पेन्शन, शिक्षणासाठी वाढीव तरतूद आणि कर्जवाढ या बाबी मतदारांना आवडल्या नाहीत.
युती धर्माचे पालन करणारा फिनलँड Finland in NATO
२ एप्रिल २०२३ ला झालेल्या निवडणुकीत फिनलंडच्या संसदेच्या २०० जागांसाठी मतदान होऊन बहुमत कुणालाच मिळालेले नाही. Finland in NATO यात पेट्टेरी ऑर्पो यांच्या नॅशनल कोएलेशन या लिबरल कॉन्झव्र्हेटिव्ह पक्षाला पूर्वीच्या तुलनेत १० जागा जास्त मिळून एकूण ४८ जागा आणि २०.८ टक्के मते, रिक्का पुर्रा यांच्या फिन्स या उजव्या पक्षाला पूर्वीच्या तुलनेत ७ जागा जास्त मिळून एकूण ४६ जागा आणि २०.१ टक्के मते, सना मरीन या मावळत्या पंतप्रधानांच्या एसडीपी या डावीकडे झुकलेल्या सोशल डेमोक्रॅट पक्षाला पूर्वीच्या तुलनेत ३ जागा जास्त मिळून एकूण ४३ जागा आणि १९.९ टक्के मते मिळाली आहेत. उरलेल्या ६३ जागा सहा लहान पक्षांना मिळाल्या आहेत. Finland in NATO युक्रेनला पाठींबा देणारे परंपरावादी ऑर्पो हे माजी अर्थमंत्री युतीचे सरकार स्थापन करतील. फिनलंडला युतीच्या कारभाराचे नावीन्य नाही. किमान सामायिक कार्यक्रम ठरवून युती धर्माचे पालन करण्याची परंपरा फिनलंडमध्ये चांगलीच रुळली आहे. Finland in NATO अशाप्रकारे त्रिशंकू स्थिती आणि पक्षोपपक्षांची बजबजपुरी असली, तरी हे सर्व पक्ष फिनलंडने नाटोत सामील व्हावे, या मतावर मात्र ठाम आहेत, हे विशेष!
९४२२८०४४३०