महेंद्र गायकवाडने जिंकली 35 लाखांची गदा

- छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा

    दिनांक :24-Apr-2023
Total Views |
अहमदनगर,
तीन दिवसांपासून छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेचा मानकरी (Mahendra Gaikwad) सोलापूरचा महेंद्र गायकवाड ठरला आहे. यामध्ये त्याने तब्बल 35 लाख रुपये किमतीची गदा पटकावली आहे. या स्पर्धेतील अंतिम लढत ही बेमुदत निकाली होती. मात्र यामध्ये महेंद्रने शिवराजला खाली पाडले. यामध्ये शिवराजच्या पायाला इजा झाल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले आणि महेंद्र गायकवाडचा विजय झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याला मानाची गदा देऊन त्याचा गौरव करण्यात आला.
 
Mahendra Gaikwad
 
अहमदनगर येथे भाजपा, शिवसेना यासोबतच जिल्हा तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वाडिया पार्क मैदान येथे झालेल्या या स्पर्धेचे अंतिम सामने हे रविवार पार पडले. गादी विभागातील अंतिम लढतीत शिवराज राक्षे विषयी झाला. तर माती विभागातील अंतिम लढत ही उपमहाराष्ट्र केसरी म्हणजेच सिकंदर शेख आणि (Mahendra Gaikwad) महेंद्र गायकवाड यांच्यात होणार होती. या लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. अत्यंत अटीतटीची ही लढत होती. यामध्ये 3-4 च्या गुण फरकाने महेंद्र गायकवाडने विजय मिळवला.
 
Mahendra Gaikwad
 
यानंतर सुवर्ण गदेसाठी अंतिम लढत महाराष्ट्र केसरी पुण्यातील शिवराज राक्षे आणि उपमहाराष्ट्र केसरी सोलापुरातील (Mahendra Gaikwad) महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये झाली. यामध्ये महेंद्रने बाजी मारली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गदा देऊन त्याचा गौरव करण्यात आला.