अभिनेत्रीची फसवणूक, दोघे अटकेत

    दिनांक :25-Apr-2023
Total Views |
मुंबई, 
एका अभिनेत्रीला (Actress Krishan Perera) हॉलीवूड वेब सीरिजमध्ये भूमिका देण्याचे आश्वासन देऊन नंतर तिला यूएईच्या शारजाहमध्ये ऑडिशनसाठी पाठवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही अभिनेत्री नंतर एका ड्रग्ज प्रकरणात पकडली, असे अधिकार्‍याने सांगितले.
 
Actress Krishan Perera
 
आरोपी रवी बोभाटे आणि अँथनी पॉल यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांनी (Actress Krishan Perera) अभिनेत्रीची आई प्रमिला परेरा यांना हैदराबादमधील रिअल इस्टेट व्यवहारात भरघोस कमिशन देण्याचे वचन देऊन फसवणूक केली होती. या प्रकरणी प्रमिला परेरा यांनी गुन्हे शाखेकडे तक्रारकेली की, त्यांची मुलगी अभिनेत्री क्रिसनला हॉलीवूड वेब सीरिजमध्ये भूमिका देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली होती. आरोपी बोभाटेने भारत आणि यूएई यांच्यातील एका प्रकल्पावर काम करणारी वेब सीरिज फायनान्सर म्हणून तिच्याशी संपर्क साधला आणि हिंदी वेब शो, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलेल्या कि‘सनला भूमिका देऊ केली.
 
 
त्यानुसार प्रमिला परेराने त्यांच्या मुलीशी (Actress Krishan Perera) ऑफरबद्दल चर्चा केली आणि बोभाटेला भेटल्यानंतर मुलीच्या ऑडिशनसाठी परदेशातील प्रवासाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. क्रिसन युएईच्या दुबई शहरात जाणार होती. तिचे मुंबई ते शारजाहच्या विमानाचे 1 एप्रिलचे तिकीट आरक्षित झाले होते आणि 3 एप्रिलला परतणार होती. त्याच वेळी प्रमिला परेरा आरोपी पॉलसोबत मालमत्ता व्यवहारासाठी हैदराबादला गेल्या होत्या.