महात्मा बसवेश्वर जयंतीनिमीत्त शहरातून शोभायात्रा

    दिनांक :25-Apr-2023
Total Views |
वाशीम, 
Mahatma Basaveshwar Jayanti : लिंगायत धर्माचे धर्मगुरू, विश्वगुरू महात्मा बसवेश्वर यांच्या जन्मोत्सवानिमीत्त आज, २५ एप्रिल रोजी वाशीम शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा जयजयकार करण्यात आला.
 
Mahatma Basaveshwar Jayanti
 
शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वात देशभरात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात येत असून, वाशीम शहररातही समाजबांधवांनी जयंती उत्सव साजरा केला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवा संघटना कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार बोनकिले, माजी अध्यक्ष सुधाकरआप्पा कोतीवार, दिलीपआप्पा कास्टे, संजयआप्पा कास्टे, महिला जिल्हाध्यक्ष रेखा सागरआप्पा रावले, रविआप्पा निंबलवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व महात्मा बसवेश्वर यांच्या भव्य प्रतिमेचे पुजन करून शोभायात्रेला सुरूवात करण्यात आली.
 
 
सदर शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गेे बालु चौक जावून चिंतामणी मठ याठिकाणी शोभायात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या शोभायात्रेत वाशीम शहर भजनी मंडळ, काटा भजनी मंडळ, ब्रम्हा भजनी मंडळ, फाळेगाव, सनगाव आदीसह जिल्हाभरातून वीरशैव लिंगायत समाजबांधव सहभागी झाले होते.