कौशल्य विकास विभागातर्फे 423 जागांसाठी रोजगार मेळावा

    दिनांक :25-Apr-2023
Total Views |
तभा वृृत्तसेवा
यवतमाळ,
जिल्हा कौशल्य विकास, (Skill Development Department) रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेमार्फत आभासी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा 24 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान होणार आहे. स्थानिक पातळीवर तसेच बाहेरील ठिकाणी औद्योगिक संस्थांना मनुष्यबळाची मागणी या कार्यालयाकडे नोंदविण्यात आलेली आहे. मागणीला अनुसरुन जिल्ह्यातील तसेच इतर ठिकाणच्या कंपनीशी संपर्क साधून वैभव एन्टरप्रायजेस नागपूर, भुमी विकास इंडस्ट्रिज प्रा. लि. पुसद, पिपल ट्रि व्हेन्चर प्रा. लि. औरंगाबाद, टॅलेनसेतू प्रा. लि. पूणे या कंपनी मार्फत एकूण 423 रिक्त पदांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
 
Skill Development Department
 
जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना वेब पोर्टलवर आभासी पद्धतीने (Skill Development Department) विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे. मेळाव्यामध्ये किमान 12 वी. उत्तीर्ण झालेले अभियांत्रिकी पदवी, पदविका, नर्सिंग पदवी, पदविका धारण केलेले रोजगार उमेदवारांना त्यांच्याकडील सेवा योजना कार्डचा युजरनेम व पासवर्ड लॉगिन करून सहभागी होता येणार आहे. मेळाव्याकरिता उमेदवारांकडे सेवायोजन कार्डचा युझरनेम व पासवर्ड असणे आवश्यक आहे. तो नसल्यास आभासी पद्धतीने कार्डची नोंदणी करता येणार आहे. तसेच जॉब सिकर या टॅबमध्ये लॉगिनकरून डाव्या बाजूला पं. दिनदयाल उपाध्याय जॉब फेयर यावर क्लिक करून यवतमाळ जिल्हा निवडून 24 एप्रिल ते 28 एप्रिल पर्यंत रोजगार मेळाव्यामध्ये नोंदणीकृत केलेल्या रिक्त पदाच्या पसंतीक्रमानुसार सहभागी होता येणार आहे.
 
 
मेळाव्यास उद्योजकांकडून मुलाखती, (Skill Development Department) उमेदवाराशी प्रत्यक्ष संपर्क साधून रिक्त पदाकरिता निवड करण्यात येणार आहे. तरी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. तसेच मेळाव्याच्या अधिक माहितीकरिता 07232-244395 याकार्यालयीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.