भारताच्या वाढत्या लोकसंख्येवर जर्मनीचे वादग्रस्त व्यंगचित्र!

    दिनांक :26-Apr-2023
Total Views |
नवी दिल्ली,  
जर्मनीच्या डेर स्पीगल मासिकाने (Germany cartoon) भारतातील लोकसंख्येची खिल्ली उडवीत व्यंगचित्र प्रकाशित केले आहे. भारताची लोकसंख्या चीनला मागे टाकत असल्याचे व्यंगचित्रातून दाखवण्यात आले आहे. व्यंगचित्रात दोन गाड्या दाखवल्या आहेत. एका बाजूला जीर्ण जुनी भारतीय रेल्वे माणसांनी खचाखच भरलेली दाखवली आहे, ज्यावर लोक भारतीय तिरंगा घेऊन बसलेले आहेत. त्याच वेळी, चीनची बुलेट ट्रेन एका वेगळ्या ट्रॅकवर दिसत आहे, ज्यामध्ये फक्त दोन चालक बसलेले आहेत. या व्यंगचित्राच्या माध्यमातून चीनची तांत्रिक प्रगती दाखवण्यात आली आहे, तर भारताच्या ढासळत्या पायाभूत सुविधांचे सादरीकरण करण्यात आले आहे.  
fygtb  
 
या व्यंगचित्रावर (Germany cartoon)  संताप व्यक्त करताना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, येत्या काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जर्मनीपेक्षा खूप मोठी असेल.माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनीही या व्यंगचित्रावर टीका केली आहे. हे अत्यंत जातीयवादी असल्याचे त्यांनी सांगितले. डेर स्पीगलने भारताचे केलेले हे चित्रण वास्तवाशी साधर्म्य दाखवत नाही. भारताला अपमानित करून चीनपुढे नमते घेणे हा त्याचा उद्देश आहे. त्यांनी पुढे लिहिले की, न्यूयॉर्क टाइम्समध्ये भारताच्या यशस्वी मंगळ मोहिमेची खिल्ली उडवणाऱ्या वर्णद्वेषी व्यंगचित्रापेक्षा हे वाईट आहे.  संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी झाली आहे. तर चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी आहे.