गुरुदेव उपासकांनी घेतले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरण पादुकांचे दर्शन

29 Apr 2023 17:23:09
तभा वृत्तसेवा
राळेगाव,
तालुक्यातील वाढोणा (बाजार) येथे (Rashtrasant Tukdoji Maharaj) राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरण पादुका पालखी सोहळ्यात अनेक गावांमधून गुरुदेव उपासक व उपासिकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणपादुकांचे दर्शन घेतले. 30 एप्रिल राष्ट्रसंतांच्या ग्रामजयंतीनिमित्त विदर्भातील अनेक गावांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणपादुका पालखी मिरवणूक जात असते.
 
Rashtrasant Tukdoji Maharaj
 
यावेळी राळेगाव तालुक्यातील वाढोणाबाजार येथे पालखी मिरवणुकी दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (Rashtrasant Tukdoji Maharaj) यांच्या चरण पादुकांचे दर्शन गुरुदेव उपासकांना घेता आले. तसेच राळेगाव तालुक्या अंतर्गत नव्याने नियुक्ती झालेल्या गुरुदेव उपासकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित केंद्रीय प्रचार विभाग समिती गुरुकुंज आश्रमचे सुशील वनवे, जिल्हा सेवा अधिकारी पद्माकर ठाकरे, निर्वाचन अधिकारी गुरुकुंज आश्रम डॉ. ज्ञानेश्वर मुडे, शेरअली बापूसाहेब, एकनाथ गाऊत्रे, सुखदेव इंगोले, घनश्याम फटिंग, प्रचार प्रमुख अरुण खंगार, आजीवन प्रचारक गंगाधर घोटेकर, अंबादास लालसरे, टिपणवार, आनंद चौधरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश रेंघे, प्रस्तविक विनोद देवतळे तर आभारप्रदर्शन हरिभाऊ कुबडे यांनी केले.
Powered By Sangraha 9.0