ड्रॉप रो बॉल स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

    दिनांक :04-Apr-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
उत्तराखंडच्या हरिव्दार येथे 12 वि सब ज्युनियर, चौथी युवा नॅशनल (Drop Row Ball Tournament) ड्रॉप रो बॉल चॅम्पीयनशिप स्पर्धा तथा 9 वी फेडरेशन कप 2023 स्पर्धा 30 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये ईरा इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र संघाकडुन भाग घेतला होता. त्यामध्ये मुलांच्या संघाने सुवर्ण पदक तर मुलींच्या संघाने कास्य पदक जिंकुन पांढरकवडा शहराचे नाव उंचावले. त्यामुळे सर्व खेळाडूंचे पांढरकवडा शहरात जल्लोषात स्वागत करीत त्यांची विजयी मिरवणूक प्रमुख मार्गाने काढण्यात आली.

Drop Row Ball Tournament
 
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, ठाणेदार जगदीश मंडलवार, मुख्याधिकारी राजू मोत्तेमवार तथा शाळेचे संचालक सतिश झाजरिया, गिरीश झांजरिया तथा गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. (Drop Row Ball Tournament) मुलांच्या संघामध्ये ईरा शाळेतील पारस अनिल गावंडे, आयुष निलेश कुष्टेेकर, कविश नितिन भोयर, श्रेयश बिरमोल तायडे, आर्यन खर्चे, अथर्व रविकांत चौधरी या विद्यार्थ्यांचा समावेश होता. तर मुलींच्या संघामध्ये संयुक्ता प्रवीण पत्तीवार, तनुश्री मस्की, हासीनी हरिदास दासरवार, श्रावणी दीपक महाकुळकर यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक सैयद रफीक, प्राचार्य राजेंद्र कापसे, आशिष भानेगावकर, नितिन नक्षणे यांचे मार्गदर्शन लाभले.