यात्रेकरुंसाठी मानवता विद्यालयातर्फे पाणपोई

    दिनांक :06-Apr-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
अर्जुनी मोर
तालुक्यातील बोंडगावदेवी Panpoi by School येथील प्रसिद्ध माता गंगाजमुना माता देवस्थानात 6 एप्रिलपासून सुरु झालेल्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेत सहभागी भाविकांना पिण्याचे थंड पाणी मिळावे, यासाठी मानवता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने पाणपोईची व्यवस्था करण्यात आली.
 
 

de
 
 
माता गंगाजमुना देवस्थानात Panpoi by School चैत्र पौर्णिमेनिमित्त मोठ्या यात्रेचे आयोजन होत असून जिल्ह्यासह परिसरातील भाविकांची मोठी गर्दी राहते. देवस्थान समितीतर्फे भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात असून मानवता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे पाणपोईची व्यवस्था केली जाते. यंदाही धमार्थ पाणपोई सुरु करण्यात आली असून त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य एन. एस. डोंगरवार, विद्यालयाचे संचालक राकेश लंजे, गोपीकिशन भोयर, जयदेव कापगते, माजी सरपंच राधेश्याम झोळे, प्रा. उल्हास गोबाळे, अरविंद कोटांगले, जी. पी. काशीवार, एस. एन. बोरकर, पत्रकार सुरेंद्रकुमार ठवरे, महादेव तवाडे, यशवंत नेवारे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.