मानोरा,
Rameshwar Naik तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नुकतेच खान्देशाचे सुपुत्र रामेश्वर नाईक यांचा मान्यवरांकडून सन्मान करण्यात आला. यावर्षीच्या जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धामध्ये खान्देशातील गोद्री ता. जामनेर येथे बंजारा - लबाना - नायकडा समाजाचे महाकुंभ मेळावा आयोजित करण्यात आला होता. रामेश्वर नाईक यांनी खान्देशामध्ये आयोजित या महाकुंभाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेऊन समाज बांधवांना एका ठिकाणी आणून हा कार्यक्रम शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात यशस्वी करण्यात मोठे योगदान दिले होते. जानेवारी महिन्यामध्ये आयोजित बंजारा - लबाना - नायकडा महाकुंभामध्ये देशभरातील धार्मिक, अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींनी प्रामुख्याने हजर राहून लाखोच्या संख्येने जमलेल्या समाज बांधवांना अमूल्य हितोपदेश केले.

संघ व राज्य शासनातील महत्त्वाच्या पदावरील व्यक्तिमत्वांनी सुद्धा ह्या महाकुंभात सहभाग नोंदविला होता. बंजारा - लभाना - नायकडा हा समाज संपूर्ण भारत वर्षामध्ये वास्तव्याला असून, राष्ट्र निर्मितीमध्ये मोठा वाटा आहे. भक्तीधाम येथे जितेंद्र महाराज यांच्या हस्ते रामेश्वर नाईक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार अनंत कुमार पाटील, बाबूसिंग जाधव, प्रा. पि.टी. चव्हाण, शंकर आडे, Rameshwar Naik विलास राठोड, प्रकाश राठोड यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होती. बंजारा - लबाना -नायकडा समाज घटकाची देशभरात एकसमान समृद्ध संस्कृती, प्रथा-परंपरा, चालीरीती, बोलीभाषा, वेशभूषा असून, या समाजाच्या भोळसट पणाचा गैरफायदा काही असामाजिक घटक मागील अनेक वर्षांपासून घेत असल्यामुळे ह्या अपप्रवत्तींपासून वैभवशाली इतिहास असलेल्या समाजाला वाचविण्यासाठी व एकसंघ राहण्यासाठी खान्देशामध्ये आयोजित कुंभाचा उपयोग भविष्यात होणार असल्याचे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना रामेश्वर नाईक यांनी सांगितले.