तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
Shankarpat : रामराज्य ग‘ुप केळापूर व ग‘ामवासींतर्फे गुरुवार, 11 ते 13 मे रोजी केळापूर येथे भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणार्या या स्पर्धेत अ आणि ब असे दोन गट पाडण्यात आले असून स्पर्धेचे उद्घाटन 11 मे रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी पांढरकवडा ठाणेदार जगदीश मंडलवार, जगदंबा संस्थानचे अध्यक्ष शंकर बडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष आनंद वैद्य, गजानन बेजंकीवार, राकेश नेमनवार, किशोर देशट्टीवार, विजय चालबर्डीकर, रितेश परचाके, निलेश ठाकरे, मोबीन पटेल, विजय कोंडावार, बंटी जुवारे, रमेश भुरे, सुरेश अनमुलवार, विलास गोहणे, जिवीतारानी पडलवार, काशीनाथ शिंदे, विलास गोडे, सुनील राऊत, बापू पारशिवे, विलास डहाके, राजू देशट्टीवार, देवराव भूपतवार, विजय डहाके, प्रदीप भानारकर, प्रकाश अन्नरवार, गजानन लक्षट्टीवार, गणेश अनमुलवार, संदीप व्यंकटवार, प्रशांत रिंगोले उपस्थित राहणार आहेत.
अ गटात प्रथम बक्षीस 31 हजार, द्वितीय 20 हजार, तृतीय 15 हजार, चौथे 10 हजार 750, पाचवे 5 हजार, सहावे 3 हजार, सातवे 2 हजार तर आठवे 1111 रुपये देण्यात येणार आहे. ब गटात पहिले बक्षीस 25 हजार, द्वितीय 15 हजार, तृतीय 11 हजार, चौथे 5 हजार, पाचवे 3 हजार, सहावे 2 हजार, सातवे 1 हजार तर आठवे 750 रुपये देण्यात येणार आहे. स्पर्धेेसाठी साजन गोडे, सुरेश गोहणे, प्रफुल राऊत, निलेश गोडे, प्रज्योत जुनघरे व रामराज्य ग‘ुपचे सर्व सदस्य व ग‘ामवासी घेत आहेत.