मुंबई,
Rakhi Sawant"s अभिनेत्री राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत याला मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी चेक बाऊन्स प्रकरणी अटक केली आहे. तीन वर्षांपूर्वी केलेल्या तक्रारीच्या आधारे ओशिवरा पोलिसांनी ही कारवाई केली. राकेशला 22 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
राकेश सावंतला तीन वर्षांपूर्वी एका व्यावसायिकाच्या तक्रारीवरून जामीनपात्र वॉरंट अंतर्गत अटक करण्यात आली होती. त्यावेळी राकेशला पैसे परत करण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला होता, Rakhi Sawant"sमात्र पैसे परत न केल्याने अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्याला ओशिवरा पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 22 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.