काटेपूर्णा अभयारण्यात आढळले 309 प्राणी-पक्षी

-वैशाख पौर्णिमेस प्राणिमित्रांनी केली गणना

    दिनांक :10-May-2023
Total Views |
अकोला,
Katepurna Sanctuary जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यात जवळपास 309 वन्यप्राणी व पक्ष्यांचे यात दर्शन प्राणीगणना करणारे वन्य प्रेमी यांना झाले असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे. तथापि या अभयारण्यात यापेक्षा कितीतरी पटीने अधिक वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे असे काटेपूर्णा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांनी सांगितले. अकोला वन्यजीव विभागातील काटेपूर्णा अभयारण्यात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी शुक्रवार, 5 मे रोजी प्राणी गणनेस निसर्गप्रेमी व स्वयंसेवी संस्थांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.
 
 
BDSFYT
 
त्या पाहणीतून उपरोक्त आकडेवारी समोर आली असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात बिबट 3, चितळ 80, सांभर 5, नीलगाय 64 चिंकारा 10, सायाळ 2, माकड 38, रानडुक्कर 66, मोर, लांडोर 28, आणि ससे 13 अशी या वन्यप्राणी व पशूंची संख्या असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्राणी गणनेसाठी अकोला वन विभागाकडून काटेपूर्णा येथे 5 मे रोजी आयोजन करण्यात आले होते. पाणवठ्यांशेजारी उभारण्यात आलेल्या सात मचाणांवर प्रत्येकी एक अशा सात निसर्गप्रेमींची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या सोबतीला वन कर्मचारीही देण्यात आले होते. Katepurna Sanctuary  आभासी पद्धतीने आगावू नाव नोंदणी केलेल्या निसर्गप्रेमींना शुक्रवार 5 रोजी सकाळी अभयारण्यात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर सायंकाळी वाटप केलेल्या मचाणांवर त्यांची व्यवस्था करण्यात आली. या सर्व निसर्गप्रेमींनी रात्रभर धवल अशा चंद्रप्रकाशात निसर्गाची शोभा पाहात पाणवठ्यावर आलेल्या प्राण्यांची नोंद केली. विभागीय वन अधिकारी अनिल निमजे, सहायक वनसंरक्षक वसंत साबळे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडला. वन परिक्षेत्र अधिकारी पवन जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी सहकार्य केले.