आमदार चषक क्रिकेट स्पर्धा ‘सीजन टू’चे दमदार उद्घाटन

    दिनांक :11-May-2023
Total Views |
यवतमाळ,
समर्पण बहुउद्देशीय संस्था अंतर्गत Yavatmal Premier League Cricket यवतमाळ प्रीमियर लीग क्रिकेट क्लबद्वारा आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धा सीजन टू चे उद्घाटन पार पडले. यंदाचे दुसरे वर्ष असल्याने यामध्ये अधिक सं‘येने संघांचा सहभाग होता. उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर समर्पण संस्थेचे अध्यक्ष राम साकळे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री राजू पडगिलवार, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश धुरट, नगरसेवक विजय खडसे, नारायणा पब्लिक स्कूलचे सीएमडी कोटेश्वर राव, अवधूतवाडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार मनोज केदारे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
Yavatmal Premier League Cricket
 
Yavatmal Premier League Cricket कार्यक‘माच्या सुरुवातीला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे पूजन करण्यात आले. सोबतच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीला सर्व सहभागी संघांनी मैदानात ध्वज संचालन केले. त्यानंतर प्रथम सामना खेळविण्यात आला. ठाणेदार मनोज केदारे यांनी नाणेफेक करून दोन्ही संघातील खेळाडूंचा परिचय करून घेतला आणि सामन्याचा प्रारंभ झाला. आमदार एलेवनविरुद्ध यवतमाळ प्रीमियर एलेवन यांच्यामधे दर्शनी सामना खेळविण्यात आला. या सामन्याचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी केले. आमदार मदन येरावार यांच्या मार्गदर्शनात, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या सहकार्याने या आमदार चषक सीजन टू चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक‘म संचलन डॉ. सुबोध तिखे, प्रास्ताविक यवतमाळ प्रीमियर लीग सचिव उत्पल टोंगो, मान्यवरांचे स्वागत लीगचे अध्यक्ष डॉ. मुजमिल कोशिश, निखिल रानडे, विवेक अडकिने, महेश टेंभरे यांनी केले.