चंद्रपूर: संतोषसिंह रावत यांच्यावर गोळीबार

12 May 2023 14:43:02
मूल,
Santosh Singh Rawat मूल येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर आज अज्ञात इसमाने संध्याकाळच्या दरम्यान गोळी झाडली. या घटनेत संतोषसिंह रावत यांना कोणतीही इजा झाली नसली तरी त्यांच्या हाताला घासून गोळी गेली. आज सायंकाळच्या दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मूल शाखेच्या परिसरात ही घटना घडली. गोळीबार करणारा अज्ञात असून तो फरार आहे. अनेकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
 

ASD 
 
संतोषसिंह रावत यांच्यावर गोळीबार का करण्यात आला? Santosh Singh Rawat कोणत्या हेतूने करण्यात आला? कोणी केला? हा गोळीबार कुणी घडवून आणला? या प्रश्नांची उत्तरे मात्र अनुत्तरीत आहेत. मूल शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
Powered By Sangraha 9.0