विषारी दारू प्याल्याने मृत्यू,10 लाखांची भरपाई!

14 May 2023 17:01:23
चेन्नई,
poisonous liquor तामिळनाडूच्या विल्लुपुरममध्ये बनावट दारू प्यायल्याने तिघांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी याबाबत सांगितले की, या प्रकरणी 4 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
 
cyg
 
वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, poisonous liquor ही घटना शनिवारी रात्री विल्लुपुरमजवळील मार्कनममधील एककियारकुप्पम येथे घडली. सर्व मृतांचे वय 45 ते 55 वर्षे दरम्यान आहे. पोलिसांनी सांगितले की, बनावट मद्य प्राशन केलेल्या आणखी दोन जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुद्दुचेरी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, बनावट दारू विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी ३ जणांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. बनावट दारू आणि ड्रग्सच्या धोक्याचा सामना करण्याच्या आपल्या सरकारच्या संकल्पावर अधोरेखित करताना स्टालिन म्हणाले की, या घटनेच्या संदर्भात दोन निरीक्षकांसह चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. बनावट दारू पिऊन आजारी पडलेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली आहे.
Powered By Sangraha 9.0