२२ मे रोजी कृउबास सभापती, उपसभापतीची निवड

    दिनांक :14-May-2023
Total Views |
मानोरा, 
Kriubas Election कृषी उपन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यानुसार २२ मे रोजी उपरोक्त दोन्ही पदाची होणार निवड होणार असल्याची अधीसुचना अध्यासी अधिकारी पी. एन. गुल्हाने यांनी काढली आहे. कृउबास च्या सभापत्ती व उपसभापतीच्या निवडीसाठी सकाळी १०.३० ते ११ पर्यंत नाम निर्देशन पत्र पुरवणे, ११ ते ११.३० पर्यंत नाम निर्देशन पत्र दाखल करणे,११.३०.ते १२ वाजेपर्यंत छाननी लगेच पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केल्या जाईल.
 
 
 
trg
 
 
 
त्यानंतर १२.३० पर्यंत अर्ज मागे घेणे, १२.३० ते १.३० पर्यंत मतदान होईल आणि लगेच मतमोजणी केल्या जाईल. Kriubas Election अशा प्रकारची निवड प्राकीया राहणार आहे. सभापती व उपसभापतीची निवडणूक लागल्याने सहकार क्षेत्रात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहे. बाजार समीतीचे संचालक डॉ. संजय रोठे, अभिजित पाटील, सचिन रोकडे यांची नावे सभापती पदासाठी चर्चेत असून, कोण बाजी मारणार हे निवडणुकीनंतरच कळणार आहे. महाविकास आघाडी चे नेते माजी मंत्री सुभाष ठाकरे व अनिल राठोड हे कोणाचे नाव सभापती, उपसभापतीपदासाठी सुचवितात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. बाजार समिती सभापती, उपसभापती आपलीच वर्णी लागावी यासाठी इच्छुक संचालकांनी फिल्डींग लावली असून, संचालकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सर्वकष प्रयत्न केल्या जात आहेत.