मान्सून पूर्व मशागतीच्या कामांना वेग

    दिनांक :14-May-2023
Total Views |
रिसोड, 
Cultivation Works खरीप हंगाम अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला असून अवकाळी पाऊस मागील आठवड्या पासून थांबल्यामुळे मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. यावर्षी हे ऐन उन्हाळ्यात गारांसह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले मागील आठवड्यापासून अवकाळी पाऊस थांबल्यामुळे तसेच उन्हाचा चटका वाढल्यामुळे कांदा बी, उन्हाळी उडीद, मूग काढणीचे काम सुरू आहे.
 

vg 
 
 
 
अवकाळी पावसामुळे Cultivation Works मशागतीची कामे पूर्णपणे खोळंबली होती ती कामेही आता युद्धपातळीवर सुरू झाली आहे. शेतीची नांगरणी वखरणी करणे, बांध घालणे, शेतातील काडी कचरा वेचणी, ही कामे वेगाने सुरू आहेत. ट्रॅटरच्या सहाय्याने मशागतीची कामे केली जात असले तरी शेतातील काही कामे मनुष्यबळाचा वापर करूनच करावी लागतात. उन्हाचा चटका वाढल्यामुळे तसेच लग्नसराई असल्यामुळे शेतकर्‍यांना मजुर मिळत नसल्यामुळे काडी कचरा वेचणे व इतर कामे लांबण्याची शयता निर्माण झाली आहे. खरीप हंगाम अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपल्यामुळे शेतकर्‍यांची लगबग वाढली आहे, डिझेल ची भाव वाढ झाल्यामुळे ट्रॅटर वाल्यांनीही दर वाढविले आहेत.