बियाणे खरेदी करतांना शेतकर्‍यांनी काळजी घ्यावी

14 May 2023 18:17:01
रिसोड, 
buying seeds तालुयामध्ये अनेक व्यापारी आमच्याकडे चांगल्या प्रकारचे सोयाबिन बियाणे आहे, अशी जाहीरात समाज माध्यम व अन्य मार्गाने करत असून शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी करत असताना बियाण्याची उगवनशक्ती तपासूनच बियाणे खरेदी करावे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.
 
 
 
gtrf
 
 
सोयाबीनच्या buying seeds हंगामामध्ये अनेक व्यापार्‍यांनी चांगल्या प्रकारची सोयाबिन खरेदी करून त्याची साठवणूक केली व आज ते सोयाबीन बियाणे म्हणून विकत आहेत .या सोयाबीनच्या बियाण्याची उगवनाशकती तपासूनच शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी करावे. उगवणशक्ती जर चांगली असेल तर बियाणे पेरणी करण्यास काही हरकत नाही, परंतु उगवणशक्ती कमी असल्यास बियाणे पेरण्यास अयोग्य आहे, याची काळजी शेतकर्‍यांनी घ्यावी .शेतकर्‍यांनी खते व बियाणे खरेदी करताना मान्यताप्राप्त दुकानांमधूनच खरेदी करावे जेणेकरून आपली फसगत होणार नाही याची काळजी घ्यावी.
Powered By Sangraha 9.0