नागपूर,
sanskar varg 25 एप्रिल ते 7 मे या कालावधीत करुणेश्वर शिव मंदिर, सहकारनगर, गजाननधाम परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समितीतर्फे बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. sanskar varg बालगोपालांवर संस्कार करणे हा उद्देश तर असतोच पण शिबिर उपक्रमांद्वारे मुलांमधील कलागुण समोर आणणे, सामान्य ज्ञान, सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा यांची ओळख व्हावी हा देखील असतो. sanskar varg शिबीर प्रार्थना, ॐ कार, प्राणायाम, सूर्य नमस्कार, श्लोक, देशभक्तीपर गीत, बोधकथा या नियमित उपक्रमांबरोबरच रोजचा अर्धात तास विशेष मार्गदर्शनासाठी राखीव होता. यावर्षी सविता जोशी यांनी वारली पेंटिंग कार्यशाळा घेतली. विषय होता "दहीहांडी". sanskar varg क्राफ्ट आणि कागदी पिशव्या बनवणे याचे मार्गदर्शन करण्यात आले.
sanskar varg डेंटल अवेअनेस प्रोग्राम अंतर्गत डॉ. जिचकार यांनी मुलांशी संवाद साधला. शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आणखी एक व्यक्तिमत्त्व म्हणजे अतुल गुरू. sanskar varg अतुल यांनी मुलांना महाराष्ट्रातील गड-किल्यांची माहिती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग सांगितले. विशेष म्हणजे दिवाळीत आपल्या परिसरात 10 गोष्टींच्या तयारीने सोप्या पद्धतीने किल्ला कसा बनवावा याचे मार्गदर्शन केले. sanskar varg
शिबिराच्या शेवटी पसायदान, भोजन मंत्र व खाऊ वाटप होत असे. समारोप प्रसंगी शिबिरार्थींनी विविध कलागुण सादर केले. sanskar varg शिबीर शिक्षिका म्हणून प्रतिभा आकरे, उत्तरा माहोरे, चित्रा चितळे, रजनी नादरखानी, प्रज्ञा पाठक यांनी जबाबदारी पार पाडली तर शिबिर व्यवस्थापन विभाग मेघा कोर्डे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रभात शाखा-सहकारनगर यांनी सांभाळला. sanskar varg
सौजन्य : अतुल गुरू, संपर्क मित्र