कर्नाटक मुख्यमंत्री कोण?, नेता निवडीचा पेच चिघळला

16 May 2023 19:57:02
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, 
कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री (Karnataka Chief Minister) कोणाला करावे, याबाबत काँग्रेसमध्ये अद्याप एकमत होऊ शकले नाही. मुख्यमंत्रिपदासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बंगळुरूत रविवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांना देण्यात आला. त्यानंतर राजधानी दिल्लीत नेता निवडीच्या हालचालींना वेग आला. सिद्धरामय्या सोमवारी सकाळीच दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत त्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. शिवकुमार मात्र सोमवारी दिल्लीत आले नाही. यासाठी त्यांनी प्रकृतीचे तसेच आपल्या वाढदिवसाचे कारण सांगितले.
 
Karnataka Chief Minister
 
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियांका वढेरा या आतापर्यंत सिमल्याला होत्या. मंगळवारी दुपारी त्या दिल्लीत आल्या. त्यानंतर शिवकुमारही दिल्लीत दाखल झाले. काँग्रेसमध्ये (Karnataka Chief Minister) कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून बैठकीचे सत्र आणि चर्चेच्या फेर्‍या सुरू आहेत. मात्र, काँग्रेसचे नेतृत्व आतापर्यंत कोणत्याच निष्कर्षावर पोहोचू शकले नाही. निवडणुकीचे निकाल जाहीर 72 तास उलटल्यानंतरही काँग्रेसला नव्या नेत्याची निवड करता येऊ नये, यावरून कर्नाटकमधील नेता निवडीचा मुद्दा किती गुंतागुंतीचा झाला आहे, याची कल्पना करता येऊ शकते.
 
 
वेगळ्या पर्यायांवरही विचार
कर्नाटक नेतानिवडीवरून वेगवेगळ्या पर्यांयावरही विचार सुरू असल्याचे समजते. पहिला पर्याय म्हणजे सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री तर, शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री करणे तसेच शिवकुमार यांच्याकडे गृह वा अन्य महत्त्वपूर्ण खाते द्यायचे. दुसरा पर्याय म्हणजे, शिवकुमार यांना मुख्यमंत्री करायचे आणि सिद्धरामय्या यांना उपमुख्यमंत्री करायचे. मात्र, (Karnataka Chief Minister) मुख्यमंत्री राहून चुकलेले सिद्धरामय्या शिवकुमार यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री होतील, असे वाटत नाही. तिसरा पर्याय म्हणजे, मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षांसाठी वाटायचे. मात्र, यात पहिल्यांदा कोणाला मुख्यमंत्री करायचे, हा वादाचा मुद्दा आहे. पहिल्यांदा मलाच मुख्यमंत्री करा, असा आग्रह दोन्ही नेते करू शकतात.
 
 
तीन उपमुख्यमंत्र्याचाही पर्याय
सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करून तीन उपमुख्यमंत्री करण्याचाही एक प्रस्ताव आहे. यात शिवकुमार यांच्याशिवाय लिंगायत समाजाचा एक आणि दलित समाजाचा एक असे तीन उपमुख्यमंत्री करण्यावर विचार करण्यात आला. मात्र, तीन पैकी एक उपमुख्यमंत्री होण्याची शिवकुमार यांची तयारी नाही. उपमुख्यमंत्री करायचे असेल तर, मला एकट्यालाच करा, अशी भूमिका ते घेऊ शकतात. त्यामुळे (Karnataka Chief Minister) कर्नाटकमध्ये मुख्यमंत्र्याची निवड करणे काँग्रेसच्या नेतृत्वासाठी मोठी डोकेदुखी झाली आहे.
Powered By Sangraha 9.0