बुलढाणा,
जिल्हयातील खामगाव - जालना मार्गाच्या (Khamgaon-Jalna railway line) उर्वरित परवानग्यांना लवकर हिरवी झेंडी मिळणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वतः यात जातीने लक्ष्य देणार असल्याची ग्वाही खा. प्रतापराव जाधव यांना दि. 15 मे रोजी झालेल्या बैठकीत दिले आहे. जिल्हयाची जिवनदायीनी समजली जाणारी खामगाव - जालना रेल्वेमार्गाशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित करीत हा विषय मार्गी लावण्याचा आग्रह रेल्वेमंत्री यांच्याकडे धरला. खासदार प्रतापराव जाधव हे या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करीत आहे.

(Khamgaon-Jalna railway line) खा. जाधव यांच्या पाठपुरावाने आता पर्यत या मार्गाचा डीपीआर देखील झाला आहे. या विषयात राज्य शासनाने 50 टक्के भागीदारी देण्याचे आश्वासन दिल्याने या विषया चालना मिळाली होती. मात्र या विषयाला जलद गती देण्याची मागणी खा. जाधव यांनी दिल्ली येथे रेल्वेमंत्री यांची भेट घेवून केली. मुंबई ते अमरावती साठी वंदे मातरम ऐक्सप्रेस सुरु करण्यात यावी अशीही मागणी खा. जाधव यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. अकोट ते खांडवा या रेल्वेमार्गातील बदलास मान्यता मिळाल्यानंतर या प्रकरणी शासनाच्यावतीने आता या मार्गावरील जमीन लवकरात लवकर अधिग्रहण करुन विकास कामांना गती दयावी अशी मागणी खा. जाधव यांनी केली होती. शासनाच्यावतीने सदर मार्गावरील जमीन अधिग्रहण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या प्रकरणी नोटीस देखील देण्यात आली आहे. त्यामुळे या कामाला देखील गती मिळाली असल्याचे चित्र आहे.