IPLमध्ये पियुष चावलाने स्वतःचाच विक्रम मोडला

17 May 2023 14:48:39
मुंबई,
Piyush Chawla : अनुभवी फिरकीपटू पियुष चावला यंदाच्या मोसमात जबरदस्त लयीत दिसत आहे. कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चावलाने पुन्हा एकदा लखनौविरुद्ध आपली जादू चालवली आणि विकेट घेण्यात यश मिळवले. पीयूष चावलाने लखनौचा धोकादायक फलंदाज क्विंटन डिकॉकची विकेट घेत,  मुंबईला मोठे यश मिळवून दिले. हा सामना मुंबईसाठी खूप महत्त्वाचा होता.

Piyush Chawla
 
एका मोसमात सर्वाधिक विकेट घेण्याचा स्वतःचाच विक्रम मोडण्याचे काम (Piyush Chawla) पीयूष चावलाने केले. मुंबईकडून खेळताना पियुष चावलाने या मोसमात आतापर्यंत 20 विकेट घेतल्या आहेत. पियुष चावलाने कोणत्याही मोसमात घेतलेली ही सर्वाधिक विकेट आहे. पियुष चावलाने मुंबईसाठी फिरकी विभागात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
 
संघासाठी सामना विजेता:
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्ससाठी (Piyush Chawla) पीयूष चावला सामना विजेता म्हणून उदयास आला आहे. 2023 च्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने पियुष चावलाला 50 लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले. पियुष चावला गेल्या वर्षी आयपीएलमध्ये कॉमेंट्री करत होता, मात्र या मोसमात त्याने जोरदार पुनरागमन केले आहे.
 
पियुष चावलाने (Piyush Chawla) त्याच्या एका मुलाखतीत सांगितले की, मी गेल्या आयपीएल हंगामात कॉमेंट्री करत होतो. माझा मुलगा मोठा होत होता, तो आयपीएलचे सामने पाहत असे. यामुळे मी त्याचा एक भाग व्हावे आणि माझ्या संघासाठी चांगली कामगिरी करावी अशी माझ्या कुटुंबाची इच्छा होती. मुंबईने मला ही संधी दिली आणि मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला.
Powered By Sangraha 9.0