वाढत्या तापमानाचा जनावरांच्या आरोग्यावर होतो परिणाम

17 May 2023 17:43:31
रिसोड, 
animals मागील दोन दिवसांपासुन तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जनावरांचे हाल होत असून, या तापमानाचा फटका जनावरांना बसत असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रिसोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. उन्हाच्या झळांनी पशूनांही धोका निर्माण होतो. त्यामुळे पशुपालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंर्धन विभागाने केले आहे. मे महिन्यात तापमान हे ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास त्यांचा विपरीत परिणाम गाई, म्हशींच्या आरोग्य, कार्यक्षमता, प्रजनन व उत्पादकतेवर होऊ शकतो.
 
 
ftr
 
उन्हाळ्यामध्ये वातावरणातील तापमानामुळे जनावरांच्या animals शरीराद्वारे वातावरणातील जास्त उष्णता शोषल्यामुळे किंवा शरीरातील उष्णता उत्सर्जित करण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण झाल्यास किंवा शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण झाल्यास त्यांच्या शरीरात वाढलेल्या तापमानामुळे ताण येतो. त्यामुळे प्राण्यांचे शारीरिक तापमान १०३ ते ११० अंश फॅरणहीट पर्यंत वाढते. जनावरांच्या शरीराचे तापमान नियंत्रीत करण्याची शारीरिक क्षमता कमी पडल्यास शारीरिक तापमानात वाढ होते. एका जागी उभे राहणे, कासावीस होणे, खाली बसणे अशी लक्षणे दिसुन येतात. यालाच उष्माघात म्हणतात. असे जानकार सांगतात. वेळीच उपचार न केल्यास जनावरे सुध्दा उष्माघातास बळी पडतात. त्यामुळे सकाळ व संध्याकाळ ऊन कमी असताना जनावरे चराईला सोडावे. मुबलक प्रमाणात थंड पिण्याचे पाणी पाजावे. बैलाद्वारे शेतीच्या मशागतीची कामे शक्यतो सकाळी व संध्याकाळी कमी उन्हामध्ये करणे हिताचे राहाते. अनेकदा जागे अभावी किंवा अन्य कारणाने जनावरे दुपारच्या वेळी भर उन्हात बांधली जातात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यांना उन्हाचा चटका बसु नये यासाठी पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी आशा प्रकारच्या सुचना पशुधन अधिकार्‍यांनी दिल्या आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0