जातीवाचक शिवीगाळ व मारहाण प्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल

18 May 2023 15:57:12
तभा वृत्तसेवा
हदगाव, 
हदगाव तालुक्यातील (Hadgaon Taluka) वाळकी बाजार येथे दोन गटांमध्ये चांगलीच हाणामारी होऊन 16 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. वाळकी (बाजार) येथील शाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात जमलेल्या लोकांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या तक्रारीवरून वाळकीबाजार येथील मराठा समाजातील 16 जणांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली व मारहाण प्रकरणी हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Hadgaon Taluka
 
सोमवार, 15 मे रोजी रात्री दहाच्या सुमारास (Hadgaon Taluka) येथील परमेश्वर कदम, सुदर्शन कदम, बालाजी कदम, विश्वनाथ कदम, गजानन कदम, दिगंबर कदम, भागवत कदम, अमोल कदम, संदीप कदम, संतोष कदम, राजू कदम, चंदू कदम, शेषराव कदम, दीपक कदम, गजानन कदम, योगेश कदम या व इतर काही लोकांनी आम्ही अनुसूचित जातीचे असल्याचे माहीत असूनही आम्हाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच सुमनबाई यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले अशी तक‘ार दिगंबर गायकवाड याने दिली.
 
 
या (Hadgaon Taluka) तक्रारीवरून मारहाण, जबरी चोरी, गैरकायद्याची मंडळी जमवणे, शिवीगाळ करणे, धामकावणे इत्यादी प्रकरणी तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम तीन (1) (आर) (एस) व कलम (2) (व्ही) (ए) नुसार या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून वाळकी बाजार येथे शांतता आहे. याच प्रकरणी दुसर्‍या गटाकडून देखील तक्रार दाखल झाल्याची माहिती पालिसांनी दिली. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त तैनात केला आहे. या प्रकरणी भोकरचे उपविभागीय पोलिस अधिकारी शफकत आमना व उपनिरीक्षक संजय गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0