तभा वृत्तसेवा
वरूड,
तालुक्यातील (Benoda Shaheed area) बेनोडा शहीद येथील वार्ड क्रमांक चारमधील वास्तव्यास असलेल्या हरिचंद्र वाघ यांच्या राहत्या घरात असलेल्या घरगुती विहिरीतून उकळते पाणी येत असल्याने सध्या परिसरात या विषयाची चांगलीच चर्चा रंगली आहे. सन् 2018 मध्ये या विहिरीचे खोदकाम करून 20 हात विहीर खोदून घरगुती वापरासाठी यातील पाण्याचा वापर केला जात आहे.
परंतु अचानक 6 दिवसाआधी सुरवातीला कोमट पाणी येत असल्याने उन्हाळ्याचा ॠतू असल्याने याकडे घरच्यांनी एवढे लक्ष दिले नाही; परंतु गुरूवार,18 मे रोजी विहिरीतील पाण्यातून वाफ निघत असल्याने याबाबत नागरिकांनी विहिरीजवळ गर्दी करीत आश्चर्य व्यक्त केले व ही बाब संपूर्ण तालुक्यात वार्यासारखी पसरल्याने हे आश्चर्य पाहण्यासाठी या Benoda Shaheed area भागातील नागरिकांनी दुरदुरून येऊन या स्थळी एकच गर्दी केलेली पहायला मिळाली. या विहिरीतील गरम पाण्याने विहिरीत असणारा कासव सुद्धा मुत्यूमुखी पडल्याचे घरच्यांनी सांगितले. या ठिकाणी बेनोड्याचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, यांनी सुद्धा या पहाणी करीत ही बाब तहसीलदार पंकज चव्हाण यांच्या कानावर टाकली असता त्यांनी अमरावती येथील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या पथकाला पाठविले. दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घटनास्थळी वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराळ सहाय्यक भूवैज्ञानिक हिमा जोशी आले.
त्यांच्यासोबत स्थानिक तलाठी नितेश ठाकरे, पी. डी. साळवी हे सुद्धा होते. या Benoda Shaheed area पथकाने विहिरीतून पाण्याचा नमुना घेतला. तसेच या भागात 50 फुटाच्या आतमध्ये असणार्या 7 ते 8 विहिरीपैकी अगदी जवळच असलेल्या दोन विहिरीतील पाण्याची पातळी, उंची व रूंदी तपासून त्यातीलही पाणी तपासण्यात आले. मात्र, या सगळ्या विहिरींना थंड पाणी येत असल्याचे लक्षात आले आहे.
अहवाल आल्यानंतर खरे काय ते कळेल
भूजल संरक्षण व विकास यंत्रणेच्या पथकाकडून या Benoda Shaheed area विहिरीतील पाण्याचे नमुने जीएसआय प्रयोगशाळेकडे तपासणीकरिता पाठवले आहे. तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील बाबी स्पष्ट होईल. तरी नागरिकांनी कुठलीही चुकीची अफवा समाजात पसरवू नये, असे आवाहन वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराळ यांनी तभाशी बोलताना केले.
चमत्काराचीही चर्चा
ही Benoda Shaheed area विहीर अगदी दर्ग्याच्या मागच्या बाजूला लागूनच असल्याने हा दैवी चमत्कार असल्याचीही काही नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरविली जात आहे. विहिरीतील उकळते पाणी म्हणजे कुठल्या रसायनाचा अथवा गंधकाचा परिणाम तर नाही ना, तसेच या पाण्याचा मानवी जीवनावर काही वाईट परिणाम तर होणार नाही ना, याची सखोल चौकशी करून या मागचे वैज्ञानिक कारण शोधून सत्यता पडताळणे गरजे आहे.