तिरोडा,
रोहयोच्या कामावर जाणाऱ्या एका (Woman dies) महिलेवर वीज कोसळून घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना शहरापासून 15 किमी अंतरावरील येडमाकोट येथे आज, 18 मे रोजी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मंगला हेमचंद नारनवरे (52) रा. येडमाकोट असे मृत महिलेचे नाव आहे.
त्या दुपारी जेवण करून रोजगार हमी योजनेच्या कामावर परतत असताना (Woman dies) विजांचा कडकडाट मेक गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली दरम्यान त्यांच्यावर वीज पडल्याने घटनास्थळी मृत्यू झाला. तसेच त्यांच्यासोबत फिरणार्या एका कुत्र्याचाही मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद पोलिसांनी करून प्रेत उत्तरे तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला.