तभा वृत्तसेवा
गिरड,
समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Samudrapur Committee) अध्यक्ष, उपसभापतीची निवडणूक शुक्रवार 19 रोजी होणार आहे. या बाजार समितीमध्ये सहकार महर्षी अॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास आघाडीचे 18 संचालक निवडून आले. अध्यक्षपदासाठी हिम्मत चतुर तिसर्यांदा अध्यक्षपदी बसण्याची शक्यता आहे.
शुक्रवार 19 रोजी सकाळी 11.30 ते 11.45 या वेळेत नामनिर्देशनपत्र दिले जातील, (Samudrapur Committee) vनामनिर्देशन पत्र सकाळी 11.45 ते 12.15 या वेळेत स्वीकारले जातील, नामनिर्देशनपत्रांची वर्गवारी 12.15 ते 12.30 या वेळेत केली जाईल, नामनिर्देशनपत्रे 12.15 ते 12.30 पर्यंत परत केली जातील. एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आल्यास दुपारी 1 ते 1.30 या वेळेत मतदान होईल.