तभा वृत्तसेवा
आर्वी,
Aromatic Tobacco Seized : येथील विठ्ठल वार्डातील नंदकिशोर लालवणी (36) याच्या घरी पोलिसांनी छापा मारून 10 लाख 2 हजार 526 रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला.
नंदकिशोर लालवणी याच्या घरी मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला. घर झडतीत पान पराग प्रिमीयम, पान रसिया पान मसाला, गुटखा 777 प्रिमीयम, नजर प्रिमीयम गुटखा, गोल्ड तंबाखू, जाफरानी जर्दा, राज निवास, सुगंधीत पान मसाला, भाग्य तंबाखू, ब्लॅक जर्दा, चारमिनार किमाम, सागर शक्ती तंबाखू असा वेगवेगळया थैल्यांमध्ये अवैधरित्या 10 लाख 2 हजार 526 रुपंयाचा माल मिळून आला. पंचनामा करून सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासाचे राजेश यादव यांच्या तक्रारीवरून आर्वी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरूल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्यासह अधिकारी व कर्मचार्यांनी केली.