मुंबई,
Tukaram Mundhe : राज्य सरकारने मंगळवारी दहा सनदी अधिकार्यांच्या बदल्या केल्या. पी शिवशंकर हे शिर्डी संस्थानचे नवे सीईओ असतील. राज्यात आपल्या कार्यशैलीने सर्वाधिक चर्चेत असलेले (Tukaram Mundhe) तुकाराम मुंढे यांना नवीन जबाबदारी मिळाली आहे. कृषी आणि पशुसंवर्धन खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणून त्यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पी. शिवशंकर यांच्याकडे नागपूर टेक्सटाईल विभागाचे संचालक म्हणून जबाबदारी आहे. डॉ. नितीन करीर हे सध्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून महसूल, नोंदणी आणि मुद्रांक, महसूल आणि वन विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
मिलिंद म्हैसकर यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1994 च्या तुकडीचे अधिकारी डी. टी. वाघमारे यांची गृहविभागाच्या पीएस म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. राधिका रस्तोगी यांची अल्पसंख्यक विकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेचे (Tukaram Mundhe) अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची महापारेषण विभाागाचे मु‘य व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त असलेले डॉ. अभिजित चौधरी यांची राज्य कर विभागात छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जी. श्रीकांत हे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत.