वन मंत्र्यांच्या हस्ते दोन वाघिणी सोडल्या नागझिरा अभयारण्यात! बघा व्हिडीओ

20 May 2023 16:41:41
भंडारा,
नवेगाव नागझिरा अभयारण्यात आज राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दोन वाघिणी सोडण्यात आल्या. व्याघ्र संवर्धन आणि स्थानांतरण उपक्रमांतर्गत या वाघिणींना सोडले गेले. यामुळे आता या व्याघ्र प्रकल्पात वाघिणींची संख्या चार झाली असून वाघांची संख्या आठ एवढी आहे. भविष्यात आणखी तीन वाघ या अभयारण्यात सोडण्यात येतील असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी खासदार सुनील मेंढे, खा. अशोक नेते, आ. मनोहर चांद्रिकापुरे, वन विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 r
Powered By Sangraha 9.0