हवेची गुणवत्ता तपासणारी मोबाईल व्हॅन शहरात

21 May 2023 16:33:48
नागपूर,
Air quality उपराजधानीतील हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी शासनाने आता अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज ‘मोबाईल व्हॅन’ दिली आहे. ही व्हॅन नागपुरात तैनात करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे यांनी दिली. शहरातील हवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यासाठी सद्यःस्थितीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्हीएनआयटी, टाऊन हॉल, जीपीओ चौक आणि एलआयटी अशा चार ठिकाणी उपकरणे बसविली आहेत. या माध्यमातून त्या भागातील हवेच्या प्रदूषणाची अद्ययावत माहिती नियमित संकलित केली जाते.
 
 
 
rtr
 
 
मात्र, त्याव्यतिरिक्त Air quality औद्योगिक क्षेत्र, कचरा व्यवस्थापन होणारा भाग येथील हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा उपलब्ध नव्हती. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून ही सुविधा आता मंडळाकडे आली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातील हवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यासाठी ही मोबाईल व्हॅन खरेदी करण्यात आली आहे. त्यापैकी एक व्हॅन नागपुरला देण्यात आली आहे. शहर आणि परिसरातील हवेची गुणवत्ता मापन करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या ठिकाणी ही व्हॅन उभी केली जात आहे. ज्या ठिकाणी व्हॅनच्या माध्यमातून हवेची गुणवत्ता तपासण्यात आली आहे. त्याचा सविस्तर अहवाल लवकरच मिळेल. हवेतील सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धूलिकण, वाहनांमधून आणि औद्योगिक कारखान्यांमधून होणारे उत्सर्जित होणारे प्रदूषक यांची माहिती यातून मिळेल.
 

वाहनांच्या धुरामुळे शहर प्रदुषित-
Air quality नागपुरात हवेची गुणवत्ता प्रदुषित या गटामध्ये येते. वाहनांचा धूर हे शहरातील हवा प्रदूषित होण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषण नियंत्रणाचे ध्येय धोरण ठरविताना या व्हॅनची माहिती उपयुक्त ठरेल.
व्हॅनचे वैशिष्ट्ये-
मोबाइल व्हॅनमध्ये हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी वेगवेगळे सेंसर्स लावण्यात आले आहेत. त्या माध्यमातून हवेत कोणत्या घटकाचे किती प्रमाण आहे, याची माहिती लगेच उपलब्ध होते. विजेवर आधारित ही सर्व यंत्रणा व्हॅनमध्ये बसविण्यात आली आहे.
व्हॅनमधून अशी माहिती मिळेल
- वार्‍याचा वेग आणि दिशा
- तापमान आणि हवेतील आद्रता
- अतिनील किरणांची माहिती हवेच्या गुणवत्तेबद्दल
- सूक्ष्म धूलिकण (पीएम 10)
- अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम 2.5)
- अतिनील किरणेहवेतील प्रदूषकांबद्दल
- सल्फर डायऑक्साइड
- नायट्रोजन ऑक्साइड
- कार्बन मोनॉक्साइड
- कार्बन डायऑक्साइड
Powered By Sangraha 9.0