आर .आर.आर .केंद्राचे उद्घाटन

    दिनांक :21-May-2023
Total Views |
वाशीम, 
RRR Centre वाशीम नगरपरिषद अंतर्गत आर.आर. आर. केंद्राचे उद्घाटन २० मे २०२३ रोजी नगरपरिषदचे मुख्याधिकारी पंकज सोनोने यांच्या प्रमुख उपस्थित नगर परिषदेच्या गत प्रभारी मुख्याधिकारी प्रिया मिन्नू एम.यांच्या हस्ते जिल्हा सामान्य रुग्णालय समोरील नगरपरिषद व्यापारी संकुल येथे संपन्न झाले. आर. आर. आर. केंद्र हे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घरगुती टाकाऊ वस्तू पासून निर्मिती पुनर्निर्मिती तथा पूनरुपयोग उपयोग होण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहे.
 
 
dferty
 
घरगुती टाकाऊ वस्तू जसे कपडे, पादत्राणे, पुस्तके,प्लास्टिक बॉटल, इतर टाकाऊ प्लास्टिक साहित्य इत्यादी वस्तूंचे संकलन या केंद्रात करण्यात येणार आहे. RRR Centre असे उपयोगी टाकाऊ वस्तू चे संकलन करून ते गरजूंना पुरविण्याचा नगर परिषदेचा मानस आहे. या प्रसंगी घरगुती टाकाऊ वस्तू सदर केंद्राला पुरविण्याचे आवाहन नगर परिषद वाशीमचे मुख्याधिकारी पंकज सोनोने यांनी शहरातील नागरिकांना केले आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला तत्कालीन मुख्याधिकारी प्रिया एम.मिन्नू, मुख्याधिकारी पंकज सोनोने, समुदाय संघटक सिंधू पवार, अरुण समुद्रे, बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.