नंदाबाईचा देहदानाचा संकल्प पूर्ण

21 May 2023 18:53:21
गोंदिया,
body donation मानवाचे शरीर हे नश्वर आहे. हेच जीवनाचे अखेर सत्य आहे. जीवनाचे हे सार ओळखून आपले शरीर कुणाच्या कामात यावे किंवा शरीरापासून संशोधनास मदत व्हावी, हेच ध्येय मनाशी ठरवून तालुक्यातील ढाकणी येथील नंदाबाई रमण मेश्राम या माऊलीने मरणोपरांत देहदानाचा निर्णय घेतला होता. शुक्रवार, 13 मे रोजी या माऊलीचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविलयास सोपवून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत अखेरचा निरोप दिला.
 
 

फतत  
 
 
नंदाबाई मेश्राम body donation  यांच्या पती व एकुलत्या एक मुलाचे काही वर्षापूर्वी निधन झाले. त्यामुळे त्या अधिकच खचल्या होतया. अशात त्यांनी आपल्या मृत्यूनंतर आपले शरीर वैद्यकीय क्षेत्राच्या पुढील संशोधनासाठी दान करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची माहिती समाजसेवक प्रितम मेश्राम, नातेवाईक संकल्प खोब्रागडे, रुपेश खोब्रागडे व प्रीतकुमार बंसोड यांच्याकडे बोलून दाखविली. दरम्यान तसे प्रतिज्ञापत्र त्यांनी शासकीय महाविद्यालयाला लिहून दिले. शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या शेवटच्या मराोपरांत देहदानाच्या इच्छुनुसार त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सोपविण्यात आला. यावेळी त्यांचे समाजसेवक प्रितम मेश्राम, नातेवाईक संकल्प खोब्रागडे, रुपेश खोब्रागडे, प्रितकुमार बंसोड, शुभम मेश्राम, रमेश नेवारे, जितू ठवरे, लंकेश मेश्राम, प्रविण डोंगरे, डॉ. विकास लांजेवार, अजय डोंगरे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0