पोलिसांनी तयार केले बनावट मृत्यू प्रमाणपत्र

21 May 2023 19:56:28
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
बनावट मृत्यू प्रमाणपत्र (fake death certificate) व कागदपत्रे तयार करून बेकायदेशीरपणे मालमत्तेवर कब्जा केल्याचे दोन प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी संदीप खरात याच्यासह आयाज उर्फ बबलू रफिक शेख, बंटी राऊत, मंगेश तिवस्कर, फहीम अन्सारी आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची लिंक शहरातील मारवाडी मोहल्ला परिसरातील मालमत्ता प्रकरणाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
 
fake death certificate
 
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मारवाडी मोहल्ला, पटेल चौक परिसरातील मालत्तेवर कब्जा केल्याप्रकरणी अयाज उर्फ बबलू रफिक शेख आणि कमलाकर सायंकार या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांना विचारपूस केली असता अयाज शेख याने गोंडप्लॉट येथील मालमत्तेची (fake death certificate) बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी पोलिस संदीप खरातची मदत घेतली होती. सदर मालमत्ता ही विमल पेंडसे नावाच्या महिलेची होती. त्या महिलेचे बनावट मृत्यूप्रमाणपत्र तयार करण्यात आले होते. ते उपनिबंधक कार्यालयात सादर करून त्या मालमत्तेचा 46 लाख रुपयांचा सौदा करण्यात आला होता. अयाज शेख याने अशा अनेक घटनांमध्ये बनावट कागदपत्रे बनविण्याचे काम केले असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. या प्रकरणात काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Powered By Sangraha 9.0