भारतात फेरारीचे नवे मॉडेल दाखल

22 May 2023 17:41:13
नवी दिल्ली, 
स्पोर्ट कंपनी फेरारीने सोमवारी (India Ferrari) भारतीय बाजारात नवे मॉडेल फेरारी 296 जीटीएस लॉन्च केली असून, तिची किंमत 6.24 कोटी रुपये (एक्स-शोरूम) इतकी आकारण्यात आली आहे. फेरारी 296 जीटीएसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून, अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स देण्यात आले आहेत. फार्म्युला वन कारला रोड कार्सच्या धर्तीवर उपयोगात येणारे ई-डिफ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यातून ट्रॅक्सनसंबंधी नुकसान कमी होत वेगाचे संतुलन राखता येते.
 
India Ferrari
 
ही (India Ferrari) कार केवळ 2.9 सेकंदातच शून्य ते 100 किमी प्रतितासाचा वेग पकडण्यात सक्षम आहे. शिवाय एक्सेलरेशनची शक्ती अधिक असल्याने शून्य ते 200 किमी/तासाचा वेग घेण्यास केवळ 7.6 सेकंदांचा कालावधी लागतो. त्यामुळे टॉप स्पीड हा 330 किलोमीटर प्रतितासाचा आहे. आकर्षक आणि शक्तिशाली इंजिनमुळे स्पोर्ट्स कारप्रेमींना नक्की आवडेल, असा दावा नवी दिल्लीतील फेरारी वितरण प्रमुख संयम त्यागी यांनी केला आहे.
 
 
याशिवाय अन्य (India Ferrari) फेरारीसारखे यातही इंजिन कारच्या मागील भागात दिले असून, दोन सीट्स असलेल्या कारमध्ये समोरील बोनटच्या आत स्पेसिफिकेशन सीट दिली आहे. ही एक हायब्रिड कार असून, 7.45 किलोवॅट क्षमतेची बॅटरीची सुविधा देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक मोड ही कार 25 किलोमीटरपर्यंत धावू शकते, असेही फेरारीने नमूद केले आहे.
Powered By Sangraha 9.0