पीएम किसान च्या लाभार्थी शेतकर्‍यांनी ई केवायसी करून घ्यावी !

तहसीलदार झाल्टे यांचे आवाहन

    दिनांक :22-May-2023
Total Views |
कारंजा लाड, 
farmers e KYC केंद्र सरकारच्या वतीने सन २०१९ पासुन पीएम किसान सन्मान निधी योजना राबविल्या जात असून या योजनेअतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रतिवर्षी तिन टप्प्यात सहा हजार रूपयांचे अनुदान दिल्या जाते. यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले असून, कारंजा तालुयातील पीएम किसानच्या २९५३ लाभार्थी शेतकर्‍यांनी ई केवायसी केलेली नाही.
 
 
 
ctfy
 
 
अशातच मे अखेर farmers e KYC पर्यंत कींवा जून च्या प्रारंभी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १४ वा हप्ता वितरीत होऊ शकतो त्यामुळे ज्या शेतकायांची अद्यापपर्यंत ई केवायसी करणे बाकी आहे .अशा शेतकर्‍यांनी ई केंवायसी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी केले आहे. पीएम किसान योजनेअतर्गंत १३ हप्ते शेतकर्‍यांना वितरीत करण्यात आले असून, मे किंवा जून महिन्यात चैदावा हप्ता वितरीत केल्या जाणार आहे. ई केवायसी करण्यासाठी शेतकर्‍यांना वारंवार मुदतवाढ देण्यात आली. तरीही शेतकर्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले. लाभार्थ्यांना कोणत्याही अ‍ॅनरॉइड मोबाईलवरून किंवा सीएससी केंद्रावर जाउन ई केवायसी करता येते. या योजनेअतर्गंत च्या चैदाव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी १४ वा हप्ता वितरीत होण्यापूर्वी ई केवायसी करण्याचे आवाहन तहसीलदार झाल्टे यांनी केले आहे.