डॉ. संजय तोष्णीवाल यांना विद्यापीठ विद्या परिषदेवर नामांकन

    दिनांक :23-May-2023
Total Views |
 
dsfrt56
 
 
वाशीम, 
Dr. Sanjay Toshniwal स्थानिक विदर्भ इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी महाविद्यालय, वाशीम चे संचालक, डॉ. संजय तोष्णीवाल यांची महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे विद्या परिषद सदस्य म्हणून नुकतीच निवड करण्यात आली. डॉ. संजय तोष्णीवाल हे नेहमीच त्यांच्या बुद्धी आणि मेहनतीने सगळ्यांच्याच कौतुकाचे धनी ठरत आले आहेत. आपल्या कामाचा आणि अनुभवाचा ठसा उमटवत असतानाच शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच योगदानही उल्लेखनीय आहे. डॉ. संजय तोष्णीवाल यांचा शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, डॉ संजय तोष्णीवाल याना भारत सरकारकडून फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे सुद्धा नामांकन केले होते तसेच रिसर्च व शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटंट सुद्धा मिळाले असून, अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.