शेतीतील उत्पादन वाढीला मिळणार जलयुक्त शिवारचा आधार

कृषी विभाग करणार १६६ गावात उपचारात्मक कामे

    दिनांक :24-May-2023
Total Views |
वाशीम, 
watery Shiwar जिल्ह्यातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून केली जाते. पावसाच्या पाण्यावरील अवलंबित्वामुळे ऐन पिकाच्या वाढीच्या काळात पावसाची अनियमितता आणि पावसात पडणार्‍या खंडामुळे टंचाईची स्थिती निर्माण होते. जिल्ह्याच्या सिंचनाच्या मर्यादित सुविधा, मोठे दुष्काळी क्षेत्र, जमिनीच्या हलया प्रतीचे असलेले मोठे क्षेत्र आणि बेभरवशाच्या पावसामुळे शेतीच्या क्षेत्रात वाढत जाणार्‍या अनिश्चिततेमुळे टंचाई परिस्थितीवर मात करण्यासोबतच शेतीच्या उत्पादन वाढीला जलयुक्त शिवार अभियान २.० चा मोठा आधार जिल्ह्यातील १६६ गावातील शेतीला मिळणार आहे.
 
 
 
dtr
 
 
 
जलसंधारणासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना watery Shiwar देखील जलयुक्त शिवार अभियानाप्रमाणे राबविण्यात येत आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पाणलोट विकास घटक २.०) जिल्हयात वाशीम, मालेगांव आणि मंगरुळनाथ तालुयात राबविण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियान २.० राबविण्यासाठी जिल्ह्यातील १६६ गावांची यावर्षी निवड करण्यात आली आहे. यामध्ये वाशीम तालुका २६, रिसोड तालुका २१, मालेगांव तालुका २८, मंगरुळनाथ तालुका २३, मानोरा तालुका ३३ आणि कारंजा तालुयातील ३५ गावांचा समावेश आहे.
 
 
जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड केलेल्या जिल्हयातील १६६ गावातील शेतशिवारात मुलस्थानी जलसंधारणाचे उपचार करण्यात येणार असून, सुक्ष्म सिंचनाचा वापर वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. पाण्याच्या ताळेबंदाच्या माध्यमातून जलसाक्षरता वाढविण्याच्या उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या गावांच्या शाश्वत विकासाला हातभार लागणार आहे.
कृषी विभागाने जिल्ह्यातील ६ तालुयात कृषी उपचारनिहाय आराखडयानुसार १९८८ कामे प्रस्तावित केली आहे. यामध्ये वाशीम तालुका ४११, रिसोड तालुका १९१, मालेगांव तालुका ३४५, मंगरुळनाथ तालुका ६१४, मानोरा तालुका २३० आणि कारंजा तालुयातील १९७ कामांचा समावेश आहे. आराखडयानुसार या कामावर ६७ कोटी ५२ लक्ष १० हजार रुपये खर्च प्रस्तावित आहे.
कृषी विभाग जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शेतीतील पिकांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी, भूजल पातळीत वाढ करण्यासाठी, विकेंद्रीत जलसाठे तयार करण्यासोबतच संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्याचे मोठे काम या १६६ गावात होणार आहे. कृषी विभागाच्या १४ प्रकारच्या उपचार पध्दतीमुळे या गावातील शेतीचे चित्र बदलण्यास मदत होणार असून, शेतकर्‍यांच्या उत्पादनात या अभियानामुळे वाढ होईल. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० मुळे जिल्ह्यातील वाशीम, मालेगांव आणि मंगरुळनाथ तालुयात सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. जलयुक्त शिवार अभियान आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून कृषी विभागाच्या शेतीतून उत्पादन वाढीसाठी प्रस्तावित आराखड्यातील कामातून १६६ गावातील शेतकर्‍यांचे जीवनमान भविष्यात निश्चितच बदललेले दिसतील.