मेडिकल चौकात तयार झालाय मृत्यूचा सापळा

- रस्ता बंद असल्याने वाहन चालक येतात राँग साईड

    दिनांक :24-May-2023
Total Views |
नागपूर, 
Medical Chowk : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काही बेशिस्त वाहन चालक निर्ढावले असून त्याच्या या बेशिस्तीपायी सरळमार्गी वाहन चालकांच्या जिवाला धोका निर्माण होतो. मेडिकल चौकात असाच एक मृत्यूचा सापळा तयार झाला आहे. बाजूलाच अंत्यसंस्कार साहित्य विक‘ीची दुकानेही आहेत, हे विशेष.
 
Medical Chowk
 
मेडडिकल चौकातून (Medical Chowk) तुकडोजी पुतळाकडे रस्ता जातो. तो चौकात पाईप लाईन टाकण्यासाठी बंद केला आहे. त्यामुळे तुकडोजी पुतळ्याकडून येणारी वाहने पांडव यांच्या घरासमोरून संगम हॉटेलकडे जाऊ शकतात. मात्र, बेशिस्त वाहन चालक डावीकडे मेडिकलच्या बंद फाटकापुढून उजवीकडे राँग साईड मेडिकल चौकात वळतात. त्यामुळे संगम हॉटेलकडून मेडिकलकडे जाणार्‍या वाहने या राँग साईडने येणार्‍या वाहनांवर आदळून हमखास अपघाताचे ठिकाण तयार झाले आहे.
 
 
केवळ दुचाकीच नाही तर अनेक कारही सर्रास बेपर्वाईने से राँग साईडने चौकात येतात. वळणावर रिक्षा उभे असल्याने वाहने येताना दिसत नाहीत. डावीकडून अचानकच वाहन समोर आल्यानंतर संगम हॉटेलकडून मेडिकलकडे (Medical Chowk) जाणारे वाहन चालक करकचून ब‘ेक लावतात. नियम पाळून वाहन चालवणार्‍या वाहनांच्या जिवालाच यामुळे धोका निर्माण होतो. दुसरे अपघाताचे ठिकाण संगम हॉटेलसमोर झाले आहे. बुधवारी सकाळी अकरा ते सव्वा अकरा वाजताच्या सुमारास तेथे दोन दुचाकींचा अपघात घडल. मेडिकलकडून तुकडोजी पुतळाकडे जाणारी वाहने संगम हॉटेलकडून उजवीकडे हनुमान नगरात वळतात. मात्र, पेट्रोल पंपावर जाणारी वाहनेेही पुढून यू टर्न न घेता येथूनच वळतात. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होेते. गंभीर अपघाताचे हे केंद्र ठरले आहे.

वाहतूक पोलिसांची गरज
एरवी मेडिकल चौकात (Medical Chowk) येथे वाहतूक पोलिस हमखास असतात. नेमके आता ते दिसेनासे झाले आहेत. पोलिस नसल्याचे पाहून बेशिस्त वाहन चालक निर्ढावतात. या चौकात पाईप लाईन टाकणार्‍या कंत्राटदाराने वळण मार्गाचे फलकही लावलेले नाहीत. यासंदर्भात अजनी वाहतूक पोलिस निरीक्षक विद्या जाधव यांना संपर्क साधला असता, त्यांनी तेथे प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती व्यवस्था करीत असल्याचे सांगितले.