आता अ‍ॅप सांगणार, नवरोबा घरी काम करते की नाही!

    दिनांक :24-May-2023
Total Views |
माद्रिद, 
नवरा आणि बायको ही (House Work app) संसाराच्या गाड्याची दोन चाके असतात. दोघांनीही सारख्याच प्रमाणात घर-संसाराची जबाबदारी उचलणे अपेक्षित असते. मात्र, अनेक नवरोबांनी घरगुती कामे करणे ही आपली जबाबदारी नाही, असा सोयीस्कर गैरसमज करून घेतलेला असतो. अर्थात्, काही खमक्या महिलांचा नवर्‍याकडून घरातील कामे कसे करवून घ्यायचे, या कलेत हातखंडा असतो, ती गोष्ट वेगळी! आता तर स्पेनच्या सरकारने एक अनोखे अ‍ॅप लाँच करण्याची तयारी केली आहे. नवरोबा घरातील कामे करीत आहे की नाही, याचा तपास करणारे हे अ‍ॅप आहे. नवरा घरासाठी किती वेळ देत आहे, याची माहितीही हे अ‍ॅप देईल.
 
House Work app
 
हे (House Work app) अ‍ॅप आणण्याचा उद्देश घरगुती कामे स्त्री-पुरुषांमध्ये योग्य पद्धतीने विभागली जावी हा आहे. केवळ नवर्‍यावरच नव्हे तर, घरातील अन्य सदस्यांवरही या अ‍ॅपद्वारे नजर ठेवता येऊ शकेल. त्यामुळे कुटुंबात कोण कामचुकार आहे, हेसुद्धा समजू शकेल. कुटुंबातील कोणता सदस्य कामासाठी किती वेळ देत आहे, याची माहिती संबंधित अ‍ॅप देईल. या अ‍ॅपसाठी सरकार दोन कोटी रुपये खर्च करीत आहे. मात्र, हे अ‍ॅप नेमके कसे काम करेल, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
 
 
अ‍ॅप लाँच (House Work app) झाल्यानंतर स्पेन हा महिला व पुरुषांमध्ये घरगुती कामांची वाटणी करून देणारा आणि त्यांचे निरीक्षण करणारा जगातील पहिला देश ठरेल. शिवाय स्पेनला अशीही आशा आहे की, पुरुष आपले वजनही नियंत्रित करतील. स्पेनच्या जेंडर इक्वॅलिटी मिनिस्टर अँजेला रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, हे अ‍ॅप याच वर्षीच्या उन्हाळाअखेर लाँच करण्याची योजना आहे. घर चांगल्या पद्धतीने चालवता येण्यासाठी हे अ‍ॅप मदत करील.