नवे संसद भवन; काळाची गरज

central vista project नव्या संसदेत लोकसभेची आसन क्षमता ८८८

    दिनांक :24-May-2023
Total Views |
दिल्ली वार्तापत्र
 
- श्यामकांत जहागीरदार
central vista project स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १५० व्या जयंती दिनी म्हणजे २८ मे रोजी संसद भवनाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे, ही देशवासीयांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हटली पाहिजे. कोरोना काळात म्हणजे १० डिसेंबर २०२० रोजी संसद भवनाच्या नव्या इमारतीचा शिलान्यास मोदी यांच्या हस्ते झाला होता. जवळपास अडीच वर्षांत नव्या संसद भवनाचे भव्य-दिव्य बांधकाम पूर्ण झाले, हा एक विक्रमच म्हटला पाहिजे. central vista project संसद भवनाची जुनी इमारत आता लहान पडू लागली होती. त्यामुळे नव्या संसद भवनाची आवश्यकता निर्माण झाली होती. २०२६ मध्ये लोकसभेतील जागांचे परिसीमन होणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या जागा ७०० पर्यंत वाढू शकतात. २०२९ ची लोकसभा निवडणूक वाढीव जागांनुसार होणार असल्यामुळे संसद भवनाच्या नव्या वास्तूची गरज निर्माण झाली होती. central vista project पुढील १०० वर्षांची गरज लक्षात घेऊन संसद भवनाची नवीन इमारत बांधण्यात आली आहे.
 
 

modi 
 
 
central vista project जुन्या संसद भवनाच्या लोकसभेतील आसन क्षमता ५४३ होती तर राज्यसभेची २५०. अन्य सोयी-सुविधांच्या दृष्टीनेही संसद भवनाची जुनी इमारत गैरसोयीची झाली होती. त्यामुळे नव्या संसद भवनाची चर्चा गेल्या काही वर्षांत सुरू होती. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला तसेच राज्यसभेचे तत्कालीन सभापती व्यंकय्या नायडू यांच्या नेतृत्वात दोन्ही सभागृहांनी नव्या संसद भवनाच्या बांधकामाचा प्रस्ताव एकमताने पारित केला होता. central vista project काळाची गरज म्हणून नव्या संसद भवनाच्या बांधकामाचा निर्णय मोदी सरकारने घेतला. नव्या संसद भवनातील लोकसभेची आसन क्षमता ८८८ आहे तर राज्यसभेची आसन क्षमता ३८४. म्हणजे दोन्ही सभागृहांची आसन क्षमता दीडपटीने वाढविण्यात आली. संसद भवनाची नवी इमारत भविष्यातील गरज तसेच अत्याधुनिक सोयी-सुविधांची आवश्यकता लक्षात घेऊन बांधण्यात आली. नवी इमारत चार मजली आहे. जुनी इमारत मात्र तीन मजली होती. central vista project संसद भवनाच्या जुन्या इमारतींचा शिलान्यास १०० वर्षांपूर्वी म्हणजे १२ फेब्रुवारी १९२१ रोजी करण्यात आला होता. सहा वर्षांत म्हणजे १९२७ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. प्रसिद्ध वास्तुविशारद अ‍ॅडविन ल्युटियन्स आणि हर्बट बेकर यांनी संसद भवनाच्या जुन्या इमारतीचे डिझाईन केले होते. central vista project मध्यप्रदेशातील मुरैनानजीकच्या चौसठ योगिनी मंदिराच्या गोलाकार वास्तूवरून संसद भवनाच्या इमारतीचा नकाशा तयार करण्यात आला, असे त्यावेळी म्हटले गेले.
 
 
१८ जानेवारी १९२७ रोजी या इमारतीचे लोकार्पण तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड इर्विन यांनी केले होते. त्यावेळी ही इमारत संसद भवन म्हणून ओळखली जात नव्हती तर ‘कॉन्स्टिट्युशन असेब्ली' म्हणून तिची ओळख होती. central vista project भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १७ एप्रिल १९५२ रोजी पहिली लोकसभा अस्तित्वात आली. त्यावेळी लोकसभेची सदस्य संख्या ४९९ निर्धारित करण्यात आली होती. नंतर १९५६ मध्ये संख्या ५०० झाली. १९७३ च्या ३१ व्या घटनादुरुस्तीनुसार लोकसभेच्या सदस्य संख्येत वाढ करून ती ५२५ वर करण्यात आली. गोवा, दीव, दमण पुनर्गठन कायद्यानुसार १९८७ मध्ये यात ५ ने वाढ करून ती ५३० झाली. नंतर केंद्रशासित प्रदेश पकडून ही संख्या सध्या ५४३ झाली आहे. १९५२ मध्ये राज्यसभेची सदस्य संख्या २०४ होती. १९६६ मध्ये ती २२८ तर १९८७ मध्ये २३३ झाली. तेव्हापासून राज्यसभेची सदस्य संख्या २३३ कायम आहे. central vista project याशिवाय राष्ट्रपती राज्यसभेत १२ सदस्य नामनियुक्त करू शकतात. त्यामुळे ही संख्या २४५ होते. १९५६ ला मूळ संसद भवनाच्या या इमारतीवर आणखी दोन मजले चढवण्यात आले. नंतर संसद भवनाचा विस्तार करीत १९७५ मध्ये संसदीय सौंध, २००२ मध्ये संसदीय ज्ञानपीठ आणि २०१७ मध्ये संसदीय सौध विस्तार अशी भर त्यात टाकण्यात आली.
 
 
जुन्या संसद भवनाच्या बांधकामाला १०० वर्षांपूर्वी ८३ लाख रुपये लागले होते. म्हणजे त्यावेळचा खर्च १ कोटीपेक्षाही कमी होता. नवीन संसद भवनाच्या बांधकामाचा खर्च १२०० कोटी रुपये आहे. नवीन संसद भवनाच्या बांधकामाचे क्षेत्रफळ ६४,५०० चौरस मीटर आहे. ६ एकर जागेत बांधण्यात आलेल्या जुन्या संसद भवनाच्या इमारतीचा व्यास ५६० मीटर आहे. central vista project जुन्या संसद भवनाच्या इमारतीत १४४ स्तंभ आहेत; जे या इमारतीची भव्यता आणि आकर्षकता आणखी वृद्धिंगत करतात. नवीन संसद भवनाच्या बांधकामाचे डिझाईन गुजरातस्थित कंपनी एसीपी डिझाईन यांनी केले, तर प्रत्यक्ष बांधकाम टाटा प्रोजेक्टस लिमिटेडने केले. या कंपनीने गुजरातची राजधानी गांधीनगरमध्येही सेंट्रल व्हिस्टा तसेच सचिवालयाच्या इमारतीचे डिझाईन केले होेते. मुंबई पोर्ट ट्रस्टसह काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे डिझाईनही याच कंपनीने केले होते. central vista project जुन्या संसद भवनात लोकसभा तसेच राज्यसभा अशा दोन सभागृहांशिवाय सेंट्रल हॉल (केंद्रीय कक्ष) आहे. हा सेंट्रल हॉल अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. देशाला स्वातंत्र्य संसदेच्या सेंट्रल हॉलमध्येच मिळाले होते. भारताची घटना याच कक्षात तयार झाली होती. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचे १४ ऑगस्टच्या रात्रीचे देशाच्या नियतीबाबतचे प्र्रसिद्ध भाषण याच कक्षात झाले होते.
 
 
central vista project सेंट्रल हॉलमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपती दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतात. नव्या संसद भवनात असा सेंट्रल हॉल नाही. त्यामुळे नव्या संसद भवनात राष्ट्रपतींचे अभिभाषण लोकसभेच्या दालनात होणार आहे. लोकसभेची आसन क्षमता ८८८ असली, तरी या सभागृहात जवळपास १२८० लोकप्रतिनिधी बसू शकतील एवढी व्यवस्था आहे. दिल्लीत सातत्यानं भूकंपाचे धक्के बसत असतात, त्यामुळे संसद भवनाची नवी इमारत पूर्णपणे भूकंपरोधक बांधण्यात आली. त्याचप्रमाणे ही इमारत पेपरलेस म्हणजे पूर्णपणे डिजिटल राहणार आहे. central vista project नवीन संसद भवनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात संविधान सभागृह राहणार आहे. यात भारताच्या संविधानाची मूळ प्रत ठेवली जाणार आहे. याशिवाय नव्या इमारतीत प्रेक्षकदीर्घा, ग्रंथालय, उपाहारगृह आणि अन्य सुविधा करण्यात आल्या आहेत. संसद भवनापासून हाकेच्या अंतरावर खासदारांसाठी कार्यालयांची इमारत बांधली जाणार आहे. central vista project या इमारतीत दोन्ही सभागृहांतील खासदारांना आपल्या मतदारसंघातील लोकांना भेटण्यासाठी स्वतंत्र कक्ष मिळणार आहे. एकंदरीत संसद भवनाची नवी ऐतिहासिक इमारत खासदारांसोबत देशातील जनतेच्याही अपेक्षांची पूर्ती करणारी ठरेल, यात शंका नाही.
 
९८८१७१७८१७