यूपीएससीत वाढलेला मराठी टक्का प्रेरणादायी!

upsc results परीक्षेचे चक्रव्यूह तोडण्याची गरज

    दिनांक :24-May-2023
Total Views |
वेध
 
- नंदकिशोर काथवटे
upsc results ‘असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे...' या उक्तीप्रमाणे जर एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यामागील एकमेव कारण म्हणजे अभ्यास होय. हे गेल्या कित्येक वर्षांपूर्वी आपल्या संतांनी सांगितले होते. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर यूपीएससीच्या परीक्षेत महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केले आहे. upsc results केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वर्ष २०२२ च्या मुख्य परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात यावेळी मराठीचा टक्का वाढण्यासोबतच वैदर्भीय बाणादेखील झळकला आहे. यूपीएससी परीक्षेत वाढलेला मराठी टक्का राज्यातील इतर विद्याथ्र्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. upsc results केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत जाहीर केलेल्या नागरी सेवा परीक्षेत पूर्वी इतर राज्यातीलच उमेदवारांचा समावेश असायचा. उत्तरप्रदेश, बिहार याच राज्यातील उमेदवार यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण व्हायचे. upsc results त्यामुळे या भागातील सनदी अधिकारी महाराष्ट्रात आल्यानंतर प्रशासकीय कामकाजात अनेक अडचणी येत होत्या. मात्र, आता यूपीएससीच्या यशवंतांमध्ये महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवारांचा समावेश असल्याने यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थीदेखील मागे नाहीत, हे दाखवून दिले आहे. upsc results
 
 

upsc 
 
 
 
upsc results यूपीएससी परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आलेल्या ठाण्यातील डॉ. कश्मिरा संखे या विद्यार्थिनीने देशात २५ वा क्रमांक मिळवत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यूपीएससी परीक्षेत यावेळी पहिल्या चार क्रमांकावर मुलींनीच आपले नाव कोरले आहे. त्यामुळे भारतीय मुली कुठेही कमी नाहीत, हे सिद्ध झाले आहे. देशात पहिली येणा-या इशिता किशोर या विद्यार्थिनीसह दुसèया क्रमांकावर असणा-या गरिमा लोहिया तर तिस-या क्रमांकावरील उमा हरथी एन. व चौथ्या स्थानावरील स्मृती मिश्रा या मुलींना खरंच सलाम! upsc results यूपीएससीत एकूण ९३३ उमेदवार यशस्वी झाले असून टॉप २५ रँकपैकी १४ मुली आहेत. नागरी सेवा परीक्षेत मुलींनी मारलेली बाजी खरंच कौतुकास्पद आहे. राज्याच्या दृष्टीने यावेळी लागलेला यूपीएससी परीक्षेचा निकाल मात्र डोळे उघडणारा आहे. परीक्षेत यावेळी वैदर्भीय बाणा पुन्हा एकदा झळकला असून विदर्भाच्या गोंदिया जिल्ह्यातील अमित उंदीरवाडे याने अखिल भारतीय स्तरावर ५८१ वा रँक मिळवत आपला डंका वाजविला आहे. upsc results नरखेड तालुक्यातील प्रतीक कोरडे, नागपुरातील राहुल आत्राम, राजश्री देशमुख, वैशाली धांडे या विद्यार्थ्यांच्या कष्टाला नक्कीच तोड नाही.
 
 
यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस होणे हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. मात्र, यासाठी द्यावी लागणा-या दिव्य परीक्षेची तयारी करण्यासाठी मराठी विद्यार्थी आजवर कमी पडत होते. मात्र, प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत राज्यातील उमेदवारांनी यूपीएससी परीक्षेचे चक्रव्यूह तोडले आहे. upsc results केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेची तयारी सुरुवातीपासून करून या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी एकाग्र मन, जिद्द, चिकाटी आणि कष्ट उपसण्याच्या शर्यतीत महाराष्ट्रीयन उमेदवार कमी पडत होते. मात्र, आता महाराष्ट्रसुद्धा मागे राहिला नाही, हे यूपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाèया मराठी विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. यशवंतांमध्ये महाराष्ट्राचा १२ ते १३ टक्के वाटा दिसू लागला असून ही टक्केवारी पुन्हा पुढे जाऊन वाढविण्याची जबाबदारी इतर महाराष्ट्रीयन उमेदवारांवर आली आहे. upsc results या परीक्षेत आपणही उत्तीर्ण होऊ शकतो, असा आत्मविश्वास यंदाच्या यूपीएससी परीक्षेच्या निकालानंतर मराठी मुलांमध्ये नक्कीच निर्माण होईल. कुठल्याही सोयी उपलब्ध नसताना किंवा शिकवणी नसतानाही अमित उंदीरवाडे या विद्यार्थ्याने केवळ स्वत:च्या बळावर ही परीक्षा उत्तीर्ण केली.
 
 
ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आत्मविश्वास दृढ असणे, शिस्त बाळगणे, संयम ठेवणे आणि चिकाटी या गुणांच्या भरवशावर आपण यूपीएससी उत्तीर्ण होऊ शकतो, असा मौलिक सल्ला अमितने राज्यातील विद्यार्थ्यांना दिला आहे. कोणतीही परीक्षा लहान किंवा मोठी नसते. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना केवळ आपल्या लक्ष्यावर नजर टिकवून ठेवावी लागते. upsc results त्यानंतर यश पक्के मिळतेच असेही मराठमोळ्या अमितने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न बघणा-या उमेदवारांना आवर्जून सांगितले आहे. यूपीएससी परीक्षा ही सनदी नोकरीसाठी महत्त्वपूर्ण परीक्षा असून या नोकरीत येऊ पाहणा-या मराठी विद्यार्थ्यांनी आता यूपीएससी परीक्षेत आपला टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची आणि या परीक्षेचे चक्रव्यूह तोडण्याची गरज आहे. त्यासाठी घाबरून न जाता आपल्या मनगटातील आणि मनातील ताकदीवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. upsc results यूपीएससी परीक्षेची तयारी करणा-या उमेदवारांनी यावेळी लागलेल्या निकालावर फोकस करून आपल्या परिश्रमाची दिशा ठरविण्याची गरज आहे. एकदा दिशा ठरविली की आपली दशा बदलविण्यासाठी कुणाचीच वाट बघावी लागणार नाही.
 
९९२२९९९५८८