काही तासांत बारावी निकाल...येथे पहा झटपट

25 May 2023 09:51:56
पुणे,
12th Result महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व काेकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षा घेण्यात आल्या हाेत्या. बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२५) दुपारी दाेन वाजल्यापासून ऑनलाइन जाहीर होईल. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल, अशी माहिती मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
 
12th Result Check Here
उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. 12th Result छायाप्रत मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. जुलै-ऑगस्टमध्ये हाेणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षा देणारे विद्यार्थी आणि श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी २९ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत. राज्यातील ३ हजार १९५ परीक्षा केंद्रांवर सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती.
येथे पहा निकाल...
hscresult.mkcl.org विद्यार्थ्यांना विषय निहाय गुण अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील आणि त्याची प्रिंटही घेता येईल. कनिष्ठ महाविद्यालयांना https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध करून देण्यात येईल.
Powered By Sangraha 9.0