आशिष विद्यार्थीने साठीत केले लग्न

    दिनांक :25-May-2023
Total Views |
मुंबई, 
Ashish Vidyarthi बॉलीवूडचा आवडता खलनायक आशिष विद्यार्थी याने वयाच्या 60 व्या वर्षी आसामच्या रुपाली बरुआशी लग्न केले आहे. आशिषने रुपालीसोबत गुरुवारी नोंदणीकृत विवाह केला आहे. अभिनेत्याचे हे दुसरे लग्न आहे. आशिष त्याच्या लग्नाच्या निमित्ताने म्हणतो, 'आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न करणे ही एक असामान्य भावना आहे.' आशिष आणि रुपालीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
 
 
sadetrty
गुरुवारी कोलकाता येथे पार पडलेल्या या लग्नात फक्त त्याचे कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर आता हे कपल मित्र आणि नातेवाईकांसाठी रिसेप्शन पार्टी ठेवणार आहे. Ashish Vidyarthi आशिषच्या वधूबद्दल बोलायचे तर ती आसाममधील फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटी येथील रहिवासी रुपाली ही कोलकात्यात एका फॅशन स्टोअरची मालकीण आहे. रुपालीपूर्वी आशिषचे लग्न अभिनेत्री राजोशी विद्यार्थीसोबत झाले होते. राजोशी एक प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि नाट्य कलाकार आहेत.