भीषण आग, सात मजली इमारत कोसळण्याचा धोका!

    दिनांक :25-May-2023
Total Views |
सिडनी, 
Building fire ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे एका इमारतीला भीषण आग लागली आहे. आगीमुळे सात मजली इमारत कोसळण्याचा धोका वर्तविण्यात आला आहे. सिडनीच्या सरे हिल परिसरातील रँडल स्ट्रीटवर असलेल्या सात मजली इमारतीत मोठी आग लागली. सिडनीच्या सेंट्रल स्टेशनजवळ असलेल्या इमारतीच्या ज्वाळा अनेक किलोमीटर दूरवरून दिसत होत्या. इमारतीचे जळलेले भाग रस्त्यावर पडल्याने रँडल स्ट्रीटवर वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. इमारतीचा ढिगारा खाली पडल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचेही नुकसान झाले. आग इतकी भीषण आहे की संपूर्ण सात मजली इमारत कोसळण्याचा धोका आहे.
 
 
dtg
 
 
ही आग Building fire आजूबाजूच्या इमारतींमध्येही पसरण्याचा धोका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यानंतर पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या इमारती रिकामी केल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अग्निशमन दलाच्या दोन डझन गाड्या घटनास्थळी आग विझवण्यात गुंतल्या आहेत. शंभरहून अधिक अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्य करीत आहेत. आगीची भीषण परिस्थिती पाहून मूर पार्क आणि आसपासच्या भागात रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. या भागातून सुटणाऱ्या बसेसचे मार्ग बदलण्यात आले आहेत.