2000 मूल्याच्या नोटा माघारी घेण्याच्या निर्णयाची आव्हाने

    दिनांक :25-May-2023
Total Views |
विश्लेषण
- सुधाकर अत्रे
 
2000 note  : 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे व हजार रुपयांच्या तत्कालीन नोटांवर बंदी आणण्याचा निर्णय सरकारने घोषित केला होता. हा निर्णय घोषित करताना सरकारने बरीच गुप्तता पाळली होती व त्यामुळे देशात बरेच वादळ निर्माण झाले होते. अर्थात आज हे सर्वमान्य झाले आहे की तो निर्णय देशात बोकाळलेल्या काळ्या पैसारुपी राक्षसावर व त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या धोक्यांवर एक प्रकारे सर्जिकल स्ट्राईक होता. त्यावेळी गुप्तता राखावयाची असल्यामुळे सरकारला त्या निर्णयाच्या अनुषंगाने सामान्य जनतेला होणारा त्रास कमी करण्यावर मर्यादा आल्या होत्या. परंतु नंतरच्या घटनांनी हे सिद्ध झाले, की जनतेने हा निर्णय व त्यासाठी भोगावा लागणारा त्रास सहर्ष स्वीकारला. भारतीय बँकांनी व त्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी त्या नोट बंदीची झळ सामान्य जनतेला कमीतकमी भोगावी लागावी यासाठी अक्षरशः जीवाचे रान केले. हितसंबंधी लोकांनी व विरोधी राजकीय पक्षांनी केलेला विरोध मोडीत काढून जनतेने राष्ट्र भक्तीने प्रेरित होऊन या निर्णयाचे स्वतः त्रास सोसून भक्कमपणे समर्थन केले हे त्यानंतर झालेल्या निवडणूक निकालांनी सिद्ध केले.
 
2000 note
 
नोटबंदीची अंमलबजावणी करतांना मिळालेल्या प्रतिसादावर सरकारने देखील वेळोवेळी त्वरित निर्णय घेऊन प्रामाणिक जनतेला याचा कमीतकमी त्रास व्हावा यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्यामुळे निर्माण झालेली पोकळी कमी करण्यासाठी तत्कालिक व्यवस्थेच्या रूपात (2000 note) दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या व त्याच वेळी हे स्पष्ट केले होते की एकदा सर्व सुरळीत झाल्यावर ह्या नोटादेखील परत घेण्यात येतील. 8 नोव्हेंबर 2016 रोजी सर्व 500 आणि 1000 च्या बँक नोटांची कायदेशीर वैधता रद्द केल्यावर अर्थव्यवस्थेच्या चलनाची गरज जलदगतीने पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँक कायदा, 1934 च्या कलम 24(1) अंतर्गत नोव्हेंबर 2016 मध्ये 2000 रुपये मूल्याची बँक नोट सादर करण्यात आली होती, सोबतच त्या वेळी प्रामु‘याने चलनात असलेल्या नोटांची उपलब्धता देखील वाढविण्यात आली. इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर 2000 च्या नोटा सादर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे 2018-19 मध्ये 2000 च्या नोटांची छपाई बंद करण्यात आली. 2000 मूल्याच्या सुमारे 89 टक्के नोटा मार्च 2017 पूर्वी जारी केल्या गेल्या होत्या आणि त्या आता त्यांच्या अंदाजे 4-5 वर्षांच्या आयुर्मानाच्या शेवटात आहेत. चलनात असलेल्या 2000 च्या या नोटांचे एकूण मूल्य 31 मार्च 2018 रोजी 6.73 लाख कोटींच्या शिखरावरून 31 मार्च 2023 रोजी (प्रचलित नोटांच्या 10.8 टक्के) म्हणजेच 3.62 लाख कोटीवर घसरले आहे.
 
 
31 मार्च 2018 रोजी 2000 च्या या नोटांचे (2000 note) प्रमाण सर्व प्रचलित नोटांच्या 37.3 टक्के होते ते आता 31 मार्च 2023 रोजी चलनात असलेल्या नोटांच्या केवळ 10.8 टक्के आहे. अर्थात याचा अर्थ असा आहे की इतर मूल्यांच्या नोटांचा साठा जनतेच्या चलनाची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसा असल्यामुळे सध्या ह्या दोन हजारांच्या नोटा सामान्यतः व्यवहारासाठी वापरल्या जात नाहीत. सर्व प्रकि‘या पूर्ण करण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतचा वेळ दिला असल्यामुळे सामान्य जनतेला या निर्णयाचा काही त्रास होणार नाही, अशी अपेक्षा आहे. अर्थात ज्यांनी ह्या नोटा बेहिशेबी मालमत्तेच्या रुपात साठवून ठेवल्या असतील त्यांना संबंधित अधिकार्‍यांना समर्पक उत्तरे द्यावी लागणार आहेत. परंतु सामान्य जनतेला घाबरण्याचे काहीच कारण नाही. तरीदेखील सामान्य जनतेच्या मनात ह्या प्रकि‘येविषयी काही प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे व त्यासाठी रिझर्व्ह बँकेने आपल्या संकेत स्थळावर ऋीर्र्शिींशपींश्रू ईज्ञशव र्टीशीींळेपी या मथळ्याखाली काही स्पष्टीकरण दिलेले आहे. वाचकांच्या सोयीसाठी त्याचा स्वैर मराठी अनुवाद खालील प्रमाणे केलेला आहे.
 
 
1. 2000 मूल्याच्या नोटा का काढल्या जात आहेत?
आरबीआय कायदा, 1934 च्या कलम 24(1) अंतर्गत नोव्हेंबर 2016 मध्ये (2000 note) 2000 रुपये मूल्याची बँक नोट प्रामु‘याने सर्व 500 आणि 1000 च्या नोटेची कायदेशीर वैधता काढून घेतल्यानंतर, अर्थव्यवस्थेच्या चलनाची गरज जलदगतीने पूर्ण करण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आली होती. विमुद्रीकरणाच्या उद्दिष्टाची पूर्तता झाल्यावर आणि इतर मूल्यांमध्ये पुरेशा प्रमाणात बँक नोटांची उपलब्धता झाल्यावर 2018-19 मध्ये 2000 च्या नोटांची छपाई थांबवण्यात आली. बहुसं‘य 2000 मूल्याच्या नोटा मार्च 2017 पूर्वी जारी केल्या गेल्या होत्या आणि क्लीन नोट पॉलिसीनुसार त्या त्यांच्या अंदाजे 4-5 वर्षांच्या आयुष्याच्या शेवटच्या अवस्थेत आहेत. वरील बाबी लक्षात घेऊन आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्वच्छ नोट धोरणाच्या अनुषंगाने, 2000 मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
2. क्लीन नोट पॉलिसी स्वच्छ नोट धोरण म्हणजे काय?
जनतेला चांगल्या दर्जाच्या नोटांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आरबीआयने अवलंबलेले हे धोरण आहे.
 
 
3. 2000 च्या नोटांची कायदेशीर वैधता स्थिती कायम आहे का?
होय. 2000 च्या नोटेची कायदेशीर वैधता कायम राहील.
 
 
4. 2000 च्या नोटा सामान्य व्यवहारांसाठी वापरल्या जाऊ शकतात का?
होय. लोक त्यांच्या व्यवहारांसाठी (2000 note) 2000 च्या नोटा वापरणे सुरू ठेवू शकतात आणि त्या पेमेंटमध्ये देखील मिळवू शकतात. तथापि, त्यांना 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी या नोटा बँकेत जमा करण्यासाठी आणि/किंवा बदलण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल.
 
 
5. जनतेने त्यांच्याकडे असलेल्या 2000 मूल्याच्या नोटांचे काय करावे?
सर्वसामान्य जनता त्यांच्याकडे असलेल्या 2000 च्या नोटा जमा करण्यासाठी आणि/किंवा बदलण्यासाठी बँकेच्या शाखांमध्ये जाऊ शकतात. ह्या नोटा खात्यात जमा करण्याची आणि 2000 च्या नोटा बदलून घेण्याची सुविधा सर्व बँकांमध्ये 30 सप्टेंबर 2023 पर्यंत उपलब्ध असेल. अहमदाबाद, बंगलोर, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम येथे असलेल्या रिझर्व्ह बँकांच्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये (ठजी) ह्या नोटा बदलण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सोय करण्यात आलेली आहे.
 
 
6. बँक खात्यात 2000 च्या नोटा जमा करण्याची मर्यादा आहे का?
केवायसी (घधउ) नियम आणि इतर लागू वैधानिक / नियामक आवश्यकतांचे पालन करण्याच्या अधीन राहून बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात.
 
 
7. 2000 च्या नोटा किती बदलून दिल्या जाऊ शकतील? त्या रकमेवर मर्यादा आहे का?
सर्व सामान्य जनता एकावेळी 20,000 रुपये मर्यादेपर्यंत 2000 च्या नोटा बदलू शकते.
 
 
8. बिझनेस करस्पॉन्डंटद्वारे (इउी) 2000 च्या नोटा बदलल्या जाऊ शकतात का?
बिझनेस करस्पॉन्डंटकडून (इउी) खातेदार दररोज 4000/- च्या मर्यादेपर्यंत (2000 note) 2000 च्या नोटा बदलून घेऊ शकतात.
 
 
9. एक्सचेंज सुविधा कोणत्या तारखेपासून उपलब्ध होईल?
बँकांना पूर्वतयारी व्यवस्था करण्यासाठी वेळ देण्यासाठी, जनतेला विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी एक्सचेंज सुविधेचा लाभ घेण्यासाठी 23 मे 2023 पासून बँक शाखा किंवा आरबीआयच्या ठजी शी संपर्क साधावा.
 
 
10. बँकेच्या शाखांमधून 2000 च्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेचे ग्राहक असणे आवश्यक आहे का?
याची आवश्यकता नाही. खाते नसलेली व्यक्तीसुद्धा कोणत्याही बँकेच्या शाखेत एकावेळी 20 हजार रुपये मर्यादेपर्यंत 2000 च्या नोटा बदलू शकते.
 
 
11. एखाद्याला व्यवसायासाठी किंवा इतर कारणांसाठी 20,000 रुपयांपेक्षा जास्त रोख आवश्यक असल्यास काय?
असे ग‘ाहक कुठल्याही निर्बंधांशिवाय त्यांच्या (2000 note) 2000 च्या नोटा त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करू शकतात आणि त्यानंतर या ठेवींतून आवश्यकतेनुसार प्रचलित नोटांच्या रुपात रोख रक्कम काढू शकतात.
 
 
12. एक्सचेंज सुविधेसाठी काही शुल्क भरावे लागेल का?
एक्सचेंज सुविधा मोफत दिली जाईल.
 
 
13. ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती इत्यादी व्यक्तींसाठी देवाणघेवाण आणि ठेवींसाठी विशेष व्यवस्था असेल का?
2000 च्या नोटा बदलून/जमा करण्यासाठी इच्छुक ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती इत्यादींची गैरसोय कमी करण्यासाठी व्यवस्था करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.
 
 
14. जर एखादी व्यक्ती ताबडतोब 2000 च्या नोटा जमा/बदलू शकत नसेल तर काय होईल?
संपूर्ण प्रकि‘या लोकांसाठी सुरळीत आणि सोयीस्कर बनवण्यासाठी, (2000 note) 2000 च्या नोटा जमा करण्यासाठी आणि/किंवा बदलण्यासाठी चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे जनतेला त्यांच्या सोयीनुसार दिलेल्या वेळेत या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
 
 
15. जर एखाद्या बँकेने 2000 च्या नोटा बदलून/ स्वीकारण्यास नकार दिला तर काय होईल?
सेवेत कमतरता असल्यास तक्रारीचे निवारण करण्यासाठी, ततक्रारदार/पीडित ग्राहक प्रथम संबंधित बँकेशी संपर्क साधू शकतात. तक्रार दाखल केल्यानंतर 30 दिवसांच्या आत बँकेने प्रतिसाद न दिल्यास किंवा तक्रारदार बँकेने दिलेल्या प्रतिसादावर समाधानी नसल्यास, तक्रारदार रिझर्व्ह बँक - एकात्मिक लोकपाल योजना (ठइ) अंतर्गत रिझर्व्ह बँकेच्या तक‘ार व्यवस्थापन प्रणाली पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतो.