इम्रान खान यांना देश सोडण्यास बंदी

    दिनांक :25-May-2023
Total Views |
इस्लामाबाद :
पाकिस्तान सरकारने माजी पंतप्रधान Imran Khan इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना देश सोडण्यास बंदी घातली आहे. या दोघांसह पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफच्या इतर 80 सदस्यांची नावेही या यादीत टाकण्यात आली आहेत. 9 मे रोजी इम्रान खान यांना अटक केल्यानंतर देशात झालेल्या हिंसाचारात या लोकांचा हात असल्याचा आरोप आहे.
 
 
imran khan pakistan
 
यातील अनेकांवर पाकिस्तानी लष्करी संस्थांवर हल्ले केल्याचाही आरोप आहे. पाकिस्तानात अघोषित मार्शल लॉग लागू करण्यात आल्याचा दावा Imran Khan इम्रान खान यांनी केला आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या अनेक प्रांतांमध्ये कलम 245 लागू करण्यासाठी सरकारविरोधात याचिका दाखल केली असून, याला अघोषित मार्शल लॉ म्हटले आहे. पाकिस्तानातील पंजाब, खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान आणि इस्लामाबादमधील कलम 245 च्या अंमलबजावणीला आव्हान देणारी याचिका इम्रान खान यांनी न्यायालयात दाखल केली आहे.