चीनचा सामना करणार भारतीय नौदल!

Indian Navy भारत-चीनमधील तणाव नवी गोष्ट नाही

    दिनांक :25-May-2023
Total Views |
इतस्ततः 

- डॉ. मंगेश गोविंदराव आचार्य

Indian Navy भारत आणि चीनमधील तणाव ही नवीन गोष्ट नाही. विशेषत: गेल्या तीन-चार वर्षांपासून दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये कमालीचा तणाव आहे. अलिकडेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीन आणि भारत यांच्यातील संबंध ‘असामान्य' असल्याचे सांगितले होते. Indian Navy चीन इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या विस्तारवादी धोरणांपासून परावृत्त होत नाही आणि त्यामुळेच त्याचा सामना करण्यासाठी तो आशियातील इतर देशांशी सातत्याने लष्करी सहकार्य वाढवत आहे. भारत आपल्या नौदलावर विशेष लक्ष केंद्रित करीत आहे आणि आपल्या नौदलात अनेक नवीन पाणबुड्या जोडण्याबरोबरच सैन्याच्या उपकरणांचे आधुनिकीकरण करीत आहे. Indian Navy इंडो-पॅसिफिक प्रदेश हा केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे जगातील सर्व मोठ्या शक्तींचे लक्षही याकडे लागले आहे. जगाच्या जीडीपीच्या ६० टक्के भाग येथून येतो. जागतिक व्यापाराचा ५० टक्के भाग याच भागातून जातो. भारतासाठी हे महत्त्वाचे आहे. कारण चीन भौगोलिक सीमांच्या बाबतीतही विस्तारवादी धोरण अवलंबत असून भारताला आव्हानही देत आहे. Indian Navy दक्षिण-चीन समुद्र आणि दक्षिण पूर्व आशियाला लागून असलेल्या सर्व क्षेत्रांमध्येही भारताचे हितसंबंध आहेत.
 
 

Indian Navy 
 
 
जागतिक भू-राजकारणात आणि भारत ज्या प्रकारे जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, त्यात मुत्सद्देगिरीची स्वतःची भूमिका आहे आणि लष्करी तयारीची स्वतःची भूमिका आहे. Indian Navy पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-७ बैठकीनिमित्ताने नुकतेच जपानला गेले होते. भारत लष्करी तयारी सुधारत असून मुत्सद्देगिरीचा मार्ग खुला करीत आहे. भारत संतुलित परराष्ट्र धोरण घेऊन पुढे जात आहे. आर्थिक स्तरावर भारत अजूनही चीनच्या मागे असेल, पण लष्करी स्पर्धेबाबत तयारी पूर्ण झाल्याचे ते नेहमीच सांगत असते. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात नौदलाची भूमिका वाढत असून त्यानुसार तयारी करण्यात येत आहे. भारतीय नौदल आपल्या पाणबुडीच्या ताफ्यात सातत्याने आधुनिकीकरण करीत आहे. Indian Navy प्रोजेक्ट-७५ अंतर्गत रशियाच्या मदतीने आम्ही स्कॉर्पिन पाणबुड्या बनवल्या आहेत; त्यापैकी पाच भारतीय लष्कराचा भाग आहेत. सहावी पाणबुडी भारतीय लष्कराचा भाग बनून लवकरच कार्यान्वित होणार आहे. भारतीय नौदलाने पूर्णपणे स्वदेशी आयएनएस विक्रांत लाँच केले असून ते काही दिवसांत कार्यान्वित होईल. Indian Navy आनंदाची बाब म्हणजे भारत अल्पावधीतच आण्विक प्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेल्या पाणबुड्यांचे काम पूर्ण करेल.
 
 
भारत त्या प्रणालीच्या विकासावर भर देत आहे; ज्यामुळे पाळत ठेवण्याचे काम खूप सोपे होईल. भारत अशा प्रकारची पाणबुडी प्रणाली विकसित करण्यावर विशेषतः भर देत आहे. Indian Navy भारताचा स्वतःचा ड्रोन कार्यक्रम जोरात सुरू आहे, ज्यामुळे नौदल क्षेत्रात हेरगिरी करणे सोपे होईल. याशिवाय भारत अमेरिकेकडून रीपर-९ ड्रोनही खरेदी करीत आहे. याचा अर्थ भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन भारत तयारी करीत आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाला तोंड देण्यासाठी भारत आपल्या लष्कराची, विशेषत: नौदलाची क्षमता वाढवण्यावर भर देत आहे. गेल्या तीन वर्षांपासून चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादाच्या पृष्ठभूमीवर भारताचा हा प्रयत्न पुढे आला आहे. Indian Navy या दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या अनेक फे-या होऊनही सीमावाद सोडविण्यात कोणतीही प्रगती झालेली नाही. चीनशी सामना करण्यासाठी भारत आशियातील इतर देशांसोबत सातत्याने लष्करी सहकार्य वाढवत आहे. यासाठी आपल्या नौदल ताफ्यात अनेक नवीन पाणबुड्यांचा समावेश करण्याबरोबरच, भारत लष्कराच्या उपकरणांचे आधुनिकीकरण करीत आहे. २०२३ च्या सुरुवातीपासून भारताने १७ पाणबुड्या तैनात केल्या आहेत. त्याचवेळी चीनकडे यापेक्षा चारपट अधिक पाणबुड्या आहेत. Indian Navy यूएस थिंक टँकच्या कागदपत्रांनुसार, चीनकडे डिझेल पाणबुड्या, आण्विक पाणबुड्या आणि बॅलिस्टिक मिसाईल पाणबुड्यांसह ६६ पाणबुड्या तैनात आहेत.
 
 
एका वृत्तानुसार, भारतीय नौदल फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (एआयपी) तंत्रज्ञानाने सुसज्ज तीन डिझेलवर चालणा-या पाणबुड्या तयार करणार आहे. ते माझगाव डॉक शिपबिल्डर्स द्वारे बांधले जातील; ज्याने फ्रेंच स्कॉर्पियन क्लास पाणबुडीच्या धर्तीवर यापूर्वीच कलवरी वर्गाच्या सहा पाणबुड्या तयार केल्या आहेत. Indian Navy या मालिकेतील सहावी पाणबुडी आयएनएस-वगीर २०२४ च्या सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता आहे. ही पाणबुडी पृष्ठभागविरोधी युद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्तचर माहिती गोळा करणे, खाणी टाकणे आणि पाळत ठेवणे इत्यादी अनेक मोहिमा पार पाडण्यास सक्षम आहे. तथापि, या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, चिनी नौदलाची लढाऊ क्षमता २०२५ पर्यंत ४०० जहाजे आणि २०३० पर्यंत ४४० जहाजांपर्यंत वाढविण्याचा अंदाज आहे. Indian Navy त्याचबरोबर भारतीय नौदलाला ३० वर्षांच्या पाणबुडी बांधणी योजनेचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी किमान २४ पाणबुड्या तयार कराव्या लागतील. पाण्याखालील लढाऊ क्षमता वाढविण्यासोबतच भारताने पाळत ठेवण्यासाठी ड्रोन खरेदी कार्यक्रमाला गती देण्याची योजना आखली आहे.
 
 
आणखी एका अहवालानुसार, भारतीय नौदलाने एप्रिल २०२३ मध्ये अंदमान आणि निकोबार बेटांच्या आसपासच्या भागांवर लक्ष ठेवण्यासाठी भाडेतत्त्वावर चट-९ ड्रोन तैनात केले आहे. हे ड्रोन म्यानमारच्या कोको बेटावरही लक्ष ठेवेल, जिथे चीन आपला लष्करी तळ अपग्रेड करण्यात व्यस्त आहे. Indian Navy ८ मे रोजी आसियान देश आणि भारतीय नौदलाचा ‘आसियान इंडिया मारीटाईम एक्स्जार्सैज (ई-आयएमई-२३) या युद्ध सरावाचा समारोप झाला. पहिल्यांदाच दक्षिण-चीन समुद्रात हे युद्ध सराव करण्यात आले. सिंगापूरच्या चांगी नौदल तळावर या सरावांचे उद्घाटन करण्यात आले. लष्करी सराव क्षेत्राजवळ चिनी जहाजे कथितपणे दिसल्याचे वृत्त भारतीय माध्यमांनी दिले आहे. अलीकडेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये सुरू असलेल्या तणावामुळे दोन्ही देशांमधील संबंध ‘असामान्य' असल्याचे म्हटले आहे. Indian Navy तथापि, चीनचे परराष्ट्र मंत्री चिंग गँग यांनी भारत-चीन सीमेवरील परिस्थिती ‘सामान्यतः स्थिर' असल्याचे वर्णन केले आहे. गोव्यात शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या वेळी दोन्ही देशांनी सीमा विवादावर ४ आणि ५ मे रोजी चर्चा केली. सर्व प्रयत्न करूनही दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेला गतिरोध अद्याप सुटलेला नाही.
८५५०९७१३१०